विट्यात दीड लाखांची देशी – विदेशी बनावटीची दारू जप्त

Untitled design T.
Untitled design T.
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी /  विटा – कराड मार्गावरून विनापरवाना होणारी दारूची वाहतूक विशेष पोलिस पथकाने पकडली. विट्यातील कृष्णलीला मंगल कार्यालयाजवळ गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. यात ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ड्रीमलँड वाईन शॉपचा मालक बाबा पटेल आणि ओमनी चालक मंगेश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ओमनी चालक मंगेश जाधव यास अटक केली आहे.

विटा-कराड रस्त्यावर विनापरवाना देशी – विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती विशेष पोलिस पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री पथकाने विटा – कराड रस्त्यावरील कृष्णलीला मंगल कार्यालयाजवळ एक ओमनी गाडी तपासासाठी थांबवली. यावेळी या गाडीतून १ लाख ५२ हजार १६० रुपयांच्या देशी – विदेशी दारूच्या बाटल्या, २ हजार ५०० रुपयांची रोकड आणि दारू वाहतूक करणारी गाडी असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी पोलिसांनी ओमनीचालक मंगेश जाधव आणि ड्रीमलँड वाईन शॉपचा मालक बाबा पटेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विशेष पथकाचे पोलिस कर्मचारी गौतम कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नागनाथ निचळ करीत आहेत.

इतर महत्वाचे – 

अमरावतीत निवडणूक निर्णय अधिका-यांकडून विविध बाबींचा आढावा

नागरीकांच्या समस्यांकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष…

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍याच्या कुटूंबियांसमवेत सुजय विखेंनी साजरा केला गुढी पाडवा