मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या विविध मागण्यांसाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. यावेळी महसूल विभागाचे अप्पर सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुद्रांक महानिरीक्षक एस चोक्कलिंगम,संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते.यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की,तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी येत्या दोन,तीन दिवसात सुमारे १८०९ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.
राज्यातील सातबारा संगणीकरणासाठी तलाठ्यांनी खूप मेहनत घेतली आहे.त्यामुळे त्यांना पगारवाढ देण्यात यावी अशी मागणी महासंघाने केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे पाटील यांनी सांगितले. जी तलाठी कार्यालये भाड्याच्या जागेत आहेत त्यांच्यासाठी भाडे रक्कम देण्याच्या संदर्भात महसूल विभागाने प्रक्रिया सुरु केली आहे. तलाठी कार्यालयांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
तलाठ्यांना प्रवासभत्त्यात वाढ कारण्यासंदर्भात निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले. राज्यात ८० टक्के तलाठ्यांना लॅपटॉप देण्यात आले असून उर्वरित तलाठ्यांना लवकरच देण्यात येतील. तसेच तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या प्रशिक्षणासाठी धोरण तयार करून त्यासाठी जागा उपलब्ध करण्यात येईल.
इतर महत्वाचे –
आरक्षण द्या आश्वासन नको – धनगर आरक्षण शिष्टमंडळ
धरणग्रस्तांना न्याय मिळवून देणारच -शिवेंद्रराजे भोसले
अन्यथा मोठा फटका बसेल – रामदास आठवले
सरकारी नोकरी हवी आहे तर करा इथे अर्ज