नाशिक | किसान सभेचा लॉंग मार्च आज ४ वाजता नाशिकहुन मुंबईला येण्यास रवाना होत आहे.मात्र सरकार आमची अडवणूक करीत असल्याचा आरोप किसान सभेचे नेते अजित नवले यांनी केला आहे. आदिवासींच्या विविध मागण्या सरकार दरबारी मांडण्यासाठी किसान सभेचा हा लॉंग मार्च र्मुंबईला येत आहे.मागील वर्षी मार्च महिन्यात मोर्चा काढण्यात आला होता, त्यावेळी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप पूर्ण केली नाही असा आरोप किसान सभेने केला आहे.
किसान सभेच्या या लॉंग मार्च ला नाशिक पोलिसांची परवानगी दिली नाही,फक्त मोर्चे करांना एकत्र येण्यास परवानगी देण्यात आली आहे.तसेच आंदोलकांच्या सोयीसाठी महामार्ग, बसस्थानकाची जागा देण्यात आली आहे. या मोर्च्यात हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत, त्यामुळे सरकारला या मोर्चाची दाखल घ्यावीच लागेल असे किसान सभेच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
किसान सभेच्या मागण्या पुढील प्रमाणे –
१. २०१८ पर्यंत संपूर्ण कर्ज माफी करण्यात यावी.
२ . शेतमालाला दीडपट भाव देण्यात यावा.
३ . समुद्राला वाहून जाणारे पाणी महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात वळविण्याचे धोरण.
४ . शेतकरी , निराधार यांना मिळणाऱ्या पेंशनमध्ये वाढ करावी.
५ . पॉली होऊस , जमीन व्यवस्था तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे.
इतर महत्वाचे –
राज्यात उद्यापासून १२ वी ची परीक्षा सुरु…
युती ‘या’ अटींवर – शिवसेना मंत्री रामदास कदम
‘पैसे भरा नाहीतर तुरुंगात जा’ सर्वोच्च न्यायालयाचा अनिल अंबांनी यांना दणका