मुंबई प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळाली आहे. साताऱ्यात युतीचा उमेदवार निश्चित झाला असून शिवसेनेकडून माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना उमेदवारी देण्यात अली आहे. यासाठी नरेंद्र पाटील मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतील.
नरेंद्र पाटील भाजपच्या तिकीटावरून साताऱ्यात लढतील अशीही चर्चा होती. मात्र, शिवसेनेने हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिल्याने नरेंद्र पाटील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. माथाडी कामगार संघटनेच्या माध्यमातून निर्माण झालेला जनसंपर्क आणि शिवसेना-भाजप युतीची ताकद यामुळे नरेंद्र पाटील उदयनराजेंसमोर आव्हान निर्माण करू शकतात.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत युतीकडून साताऱ्यातील जागा रिपाईसाठी सोडण्यात आली होती. मात्र या निवडणुकीत रिपाईला एकही जागा न देण्याचे ठरल्यामुळे साताऱ्यातील जागा शिवसेनेला मिळाली आहे. सातारा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांचा बराच दबदबा आहे. त्यामुळे उदयनराजे आणि नरेंद्र पाटील यांच्यातील लढत अत्यंत लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
भाजपचे दिग्गज नेते येथून लढणार…