कोल्हापूर प्रतिनिधी | कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला आज चार वर्षे उलटून गेली. तरी अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात आले नाही. तपास यंत्रणेच्या या संथ गतीच्या निषेधार्थ कोल्हापुरात आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मॉर्निंग वॉक करत निषेध करण्यात आला. यावेळी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास संथ गतीने सुरु असल्याच्या कारणावरून न्यायालयाने तपास यंत्रणेला अनेकदा फटकारले आहे.तरी तपासात सुधारणा झाली नाही. गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना शोधून त्याच्या मास्टरमाईंड शोधावा अशी मागणी या मॉर्निंग वॉक दरम्यान करण्यात आली. कर्नाटक सरकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना पकडू शकते तर महाराष्ट्र सरकार पानसरे आणि दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना का पकडू शकत नाही, असा प्रश्न यावेळी सरकारला विचारण्यात आला.
‘विवेकसाचा आवाज बुलंद करावा, दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्त्या करणाऱ्यांना त्वरित पकडा’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.देशातील ४ विवेकवाद्यांची हत्त्या झाली असून त्यांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणे गरजेचे आहे,असे मुक्ता दाभोलकर म्हणाल्या. तसेच पानसरे हत्त्या प्रकरणी चार जणांवर एसआईटी कडून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तपास एक टप्प्यावर येऊन थांबला आहे मात्र त्यात सुधारणा होण्याची गरज आहे.
इतर महत्वाचे-
लोकसभेच्या रिंगणात मी आणि सुप्रियाचं…शरद पवार
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक एकमेव पर्याय नाही – लेफ्टनंट जनरल व्ही.जी.पाटणकर