अमरावतीतून लढणाऱ्या ‘या’ उमेदवाराच्या प्रचाराला शरद पवार हजेरी लावणार

Untitled design T.
Untitled design T.

मुंबई प्रतिनिधी | अमरावती लोकसभा मतदारसंघातून आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा या निवडणूक लढणार आहेत. नवनीत राणा या अमरावतीतल्या बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या पत्नी आहेत. राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीत सहभागी करुन घेतले आहे.

नवनीत राणा अमरावतीतून युवा स्वाभिमान पक्षाच्या तिकिटावरून निवडणूक लढणार आहेत. या निवडणुकीत राणा यांना आघाडीचं पाठिंबा असणार आहेत. राणा या शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांना आव्हान देणार आहेत. अमरावतीत गेली पाच वर्ष नवनीत राणा काम करत आहेत.अमरावतीच्या विकासासाठी पवारांनी साथ दिल्याचे राणा यांनी सांगितले.

अमरावतीत नवनीत राणा निवडणूक लढणार असून, शरद पवार येऊन प्रचार करणार आहेत. पवार साहेबानी मोठं मन करुन आम्हाला जागा सोडली, यासाठी नवनीत राणांचे पती आणि अपक्ष आमदार रवी राणा यांनी पवारांचे आभार मानले आहेत.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

लोकसभा निवडणुकीत भाजप उतरवणार या स्टार उमेदवारांना रिंगणात

इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक

आधी लोकसभा निवडणूक जिंका, नंतर पंतप्रधान शोधा – शरद पवार

रोहित पवार आगामी लोकसभेत शिवसेनेच्या आढळरावांना पुरून उरणार?

शरद पवार पुण्यातून लढवणार लोकसभा ?