सांगली प्रतिनिधी / छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासानिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून मूक पदयात्रा काढण्यात आली. वढूबुद्रुक येथून शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी ज्योत आणली होती. ती मारुती मंदिरात ठेवण्यात आली होती. आज सकाळी मूकपडयात्रेस प्रारंभ झाला. आनंदराव चव्हाण यांच्याहस्ते ज्वालेचे पूजन करण्यात आले. राजू शहापूरे यांनी ध्येयमंत्र म्हंटला. मिलिंद तानवडे यांनी ‘नक्षे परसे नाम मीटादो ”हे गीत म्हटले. संभाजीसुर्यहृदय हा श्लोक सामुदायिकरीत्या म्हणण्यात आला.
सांगलीतील मारुती रोडवरून मूकपदयात्रेला प्रारंभ झाला. कापडपेठ, राजवाडाचौक, स्टेशन चौक, बदामचौक, पंचमुखी मारुती रोड, फौजदारगल्ली, बापटबाल रोड, गावभाग या मार्गावरून निघालेली मूकपदयात्रा मारुती चौकात समाप्त झाली. याठिकाणी संभाजी महाराजांच्या प्रतीकात्मक चितेला भडाग्नी देण्यात आला.
बलिदान मासानिमित्त अनेकांनी उपवास, गोड न खाणे, चप्पल न घालणे, गादीवर न झोपता जमीनीवर झोपणे, मुंडण करणे, चहा न पिणे असे संकल्प केले होते. बलिदानमासाचे हे ३३० वे वर्ष आहे. मूकपदयात्रेत माजी आमदार नितीन शिंदे, नितीन चौगुले, अविनाश सावंत, बापू हरिदास, अंकुश जाधव, सुनील बेळगावे, मोहनसिंग रजपूत, प्रशांत गायकवाड, संजय तांदळे, सचिन पवार, अमित करमुसे यांच्यासह अन्य मान्यवर व शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
इतर महत्वाचे –
भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांचा जिल्ह्यात हायटेक प्रचार
लागीर झालं जी या मालिकेतील कलाकारांची नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक.