पुणे प्रतिनिधी | राज्यातील कानाकोपऱ्यातून कर्णबधिर तरुण-तरुणी पुण्यात येऊन ते आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यात समाज कल्याण आयुक्तालयासमोर एकत्र आले होते. शिक्षणासंबंधी या तरुणांच्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्या यासाठी हे आंदोलन त्यांनी उभारले होते. मात्र पोलिसांनी आंदोलन दडपण्यासाठी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत आहे.
कर्णबधिर मुलांना जे शिक्षण दिले जाते त्याचा या मुलांना काही उपयोग होत नाही.त्यामुळे त्यांना सांकेतिक भाषेत शिक्षण मिळावे अशी त्यांची मागणी आहे. सांकेतिक भाषेत शिक्षण हा आमचा अधिकार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कर्णबधिर मुलांना नोकरीच्या संधी मिळत नसल्याने त्यांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे सरकारने आमच्या नोकरीसाठी विशेष तरतूद करावी अशी त्यांची मागणी आहे.
अपंग कल्याण आयुक्त बालाजी मुंजाल यांची तडकाफडकी बदली करण्यात आली यालाही आंदोलनकर्त्यांचा विरोध आहे. मंजुळे यांची नंदुरबारच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. गेली अनेक वर्षात कर्णबधिर असल्याचे बोगस प्रमाणपत्र मिळून आमच्या नोकऱ्या लाटल्या जात आहेत, याची तपासणी करण्याची मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या सर्व मागण्यांसाठी कर्णबधिर तरुणांनाही हे आंदोलन उभारले आहे.
इतर महत्वाचे –
Bsf भरती होण्याच स्वप्न उतरणार सत्यात
सरकारने २४ तासाच्या आत तोडगा काढावा, नाहीतर मी उपोषणाला बसेन – सुप्रिया सुळे
‘यांची’ आश्वासने म्हणजे ‘लबाड घरच आवताण’ – शरद पवार