जेव्हा बिबट्या पोल्ट्रीत शिरतो …

Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख
नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील चारही बाजूला गेल्या आठ दिवसापासुन बिबटयांची दहशत पसरली आहे. या ठिकाणी बिबट्यांची संख्या जास्त असल्याने पिंजरा एक अन बिबटे अनेक अशी अवस्था झाली आहे. बिबटे पकडण्यासाठी पिंजऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यातच बिबट्याच्या भीतीने आजूबाजूच्या गावातील लोक भयभीत झाले आहेत.

आज बेलगांव कुरहे या गावात जनता शाळेजवळ असलेल्या एका पोल्ट्री फ़ॉर्ममध्ये बिबटया शिरल्यामूळे एकच धावपळ उडाली. पोल्ट्रीत आलेल्या या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.भक्षाच्या शोधात व उन्हाच्या तडाख्यात वनवन फिरणाऱ्या बिबटयाच्या नजरेस पोल्ट्रीफॉर्म पडल्याने त्याने पोल्ट्रीकडे धाव घेतली.

इगतपुरी तालुक्यातील बेलगांव कुऱ्हे येथील जनता विद्यालयाच्या जवळच असलेल्या संजय गुळवे यांच्या पोल्ट्रीफ़ॉर्ममध्ये बिबट्या आला होता. आज सकाळी ११ वाजता या बिबट्याने शेडला फेरी मारून शेडवर फुटलेल्या पत्र्यावर गेला तेथून बिबटया थेट पोल्ट्रीमध्येच पडला.आत गेल्यावर बिबटयाने पोल्ट्रीतील काही कोंबड्यांचा फड़शा पाडला. मात्र बिबट्याच्या वावराने परिसरात भीतीच वातावरण पसरले आहे.

 

इतर महत्वाचे –

दहा वर्षात उदयनराजेंनी जिल्ह्याचे वाटोळे केले, पंजाबराव पाटील यांचा गंभीर आरोप

उदयनराजेंविरोधात लढणार्‍या नरेन्द्र पाटीलांनी घेतली शिवेंद्रराजेंची गळाभेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

प्रविण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, पुण्यातून लढणार लोकसभा?

जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू