Maharashtra: देशातील पहिल्या LNG बस सेवेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra: राज्यामध्ये नवनवे महामार्ग , रेल्वे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. त्यातच सर्वसामान्यांची लाल परी आता एलएनजी म्हणजेच लिक्वीफाईड नॅचरल गॅस इंधनावर चालणार आहे. सध्या पेट्रोल डिझेलगड्यांनो पर्याय म्हणून इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आल्या आहेत. कालानुरूप बदलण्याचा निर्णयही महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आला असून एस टी आता एलएनजी वर चालवण्याचा निर्णय (Maharashtra) घेण्यात आला आहे. याकरिता एका कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाकडून करार करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या प्रोजेक्ट बद्दल…

महाराष्ट्रातील पहिली एलएनजी-इंधन असलेली बस, डिझेलमधून रूपांतरित करण्यात आली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले.मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी एलएनजी रूपांतरणमुळे एसटी बसमधील बदल, डिझेलच्या तुलनेत होणारे लाभ याविषयी माहिती घेतली आणि बसचे निरीक्षण केले.एसटी महामंडळातील ५००० डिझेल वाहनांचे (Maharashtra) एलएनजी (लिक्वीफाईड नॅचरल गॅस) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांमध्ये रुपांतरण करण्यात येणार आहे.

महामंडळाकडे डिझेलवर चालणारी सुमारे १६००० प्रवासी वाहने आहेत. महामंडळाच्या (Maharashtra) एकूण खर्चापैकी सुमारे ३४ टक्के खर्च हा इंधनावर म्हणजेच डिझेलवर केला जातो. डिझेलच्या दरात होणारी वाढ लक्षात घेता व हरित परिवहनाची संकल्पना राबविण्यासाठी डिझेल ऐवजी पर्यायी इंधन वापरणे ही काळाची गरज आहे. यामुळे टप्प्याटप्प्याने पूर्ण एस.टी महामंडळातील वाहने एलएनजी इंधनावर आधारित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने महाराष्ट्रास एलएनजी या पर्यायी इंधनाचा पुरवठा (Maharashtra) करण्यासाठी मे. किंग्स् गॅस प्रा. लि. यांचेबरोबर सामंजस्य करार (MOU) केला असून त्यामध्ये परिवहनसाठी देखील एलएनजीचा वापर व पुरवठा याचा समावेश करण्यात आला आहे. डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणामध्ये (Maharashtra) एलएनजीमुळे सुमारे १० टक्के घट होणार आहे. निश्चितच महामंडळाचा इंधनावरील खर्च कमी होणार आहे. महामंडळाच्या सुमारे ९० आगारात एलएनजी वितरण केंद्रही उभारण्यात येणार आहे.