मुंबई । सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन 4.0 सुरु झाला आहे. पहिल्या ३ लॉकडाउनच्या तुलनेत चौथ्या लॉकडाउनमध्ये नियम थोडे शिथिल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य शासनातर्फे चौथ्या टप्प्याच्या लॉकडाउनसाठी सविस्तर नियमावली जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत या नियमावलीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा बदल म्हणजे यापुढे राज्यात एकूण तीन झोनमध्ये कोरोनाबाधित क्षेत्रांची विभागणी करण्यात आलेली असेल. रेड झोन, नॉन रेड झोन आणि कंटेन्मेंट झोन अशा स्वरुपात ही विभागणी केलेली असेल. ज्या धर्तीवर संबंधित परिसरामध्ये लॉकडाऊनच्या नियमांची आणखी करण्यात आलेली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर नियम अधिक कठोर असतील. जेथे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. तर, रेड आणि ऩॉन रेड झोनमध्ये त्याचं स्वरुप काहीसं बदललेलं असेल. राज्य सरकारच्या नवीन नियमावलीनुसार राज्यातील काही भाग हे रेड झोन म्हणून घोषित केले आहेत. त्यामुळे हा भाग वगळता राज्यात इतर ठिकाणी अनेक सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. रेड झोनची यादी नेमकी कोणती हे पाहा….
राज्यातील रेड झोनची यादी
१. मुंबई महानगर प्रदेश – यामध्ये मुंबई महापालिकेसह, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, भिवंडी-निझामपूर, नवी मुंबई, वसई-विरार या पालिका रेड झोनमध्ये येतात.
२. पुणे महापालिका –
३. सोलापूर महापालिका
४. औरंगाबाद महापालिका
५. मालेगाव महापालिका –
६. नाशिक महापालिका
७. धुळे महापालिका
८. जळगाव महापालिका
९. अकोला महापालिका
१०. अमरावती महापालिका
रेड झोनमध्ये काय सुरू राहणार
– अत्यावश्यक सेवेची सर्व दुकानं सुरु राहतील.
– इतर दुकानांना परवानगी, त्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार.
– स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली तर दारूची दुकानं सुरू करता येणार, दारूची होम डिलिव्हरी करता येणार आहे.
– टॅक्सी, रिक्षा सेवा बंद राहणार.
– दुचाकीवर एकालाच प्रवास करण्याची परवानगी.
-मॉल्स, परवानगी नसलेली दुकाने, परवानगी नसलेली इतर आस्थापनं साफसफाईसाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळात सुरू ठेवू शकतात
– दस्त नोंदणी कार्यालय, आरटीओ कार्यालय सुरू करण्याची परवानगी
-विद्यापीठ, महाविद्यालयात उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी ५ टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्यास परवानगी.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”