मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्रातील बहि‍णींना 1500 रुपयांची नव्हे तर सुरक्षित बहीण योजनेची गरज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. मात्र दुसरीकडे याच महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या महिनाभरात नवी मुंबई आणि पनवेल-उरण परिसरात दोन महिलांचे निर्घृण खून झालेत. उरणमधील येथील 22 वर्षीय तरूणी यशश्री शिंदे 25 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. तिचा शोध सुरू असतानाच तिचा छन्नविछिन्न झालेला मृतदेह सापडला. यावरून मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी सरकारवर निशाणा साधत राज्यातील महिलांना लाडक्या बहीण योजनेची नव्हे तर सुरक्षित बहीण योजनेची गरज अधिक आहे.त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवश्यक ती पावलं उचलली पाहिजेत, असं म्हटलं आहे.

योगेश चिले यांनी ट्विटरवर एक विडिओ शेअर करत म्हंटल, गेल्या महिनाभरात नवी मुंबई आणि पनवेल-उरण परिसरात दोन बहि‍णींचे निर्घृण खून झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत:ला धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्य म्हणवतात. त्यांनी धर्मवीर-1 आणि धर्मवीर-2 असे दोन चित्रपट काढले. या दोन्ही चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांच्या दोन्ही हातात राखी भरल्याचे दाखवण्यात आले आहे. उद्देश एकच की, आनंद दिघे साहेब कशाप्रकारे बहि‍णींचे रक्षण करायचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तु्म्ही आनंद दिघे यांचे शिष्य आहात. तुम्ही राज्यातील बहि‍णींसाठी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Scheme) आणली. या योजनेतून बहि‍णींना महिन्याला 1500 रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळेल. पण तुमच्या या लाडक्या बहि‍णींना महिन्याला 1500 रुपयांची गरज नाही. त्या पैसे कमावू शकतात. फक्त त्या जिथे पैसे कमवायला जातात, जिथे नोकरी करतात, जिथे शिक्षण घ्यायला जातात, तिथे त्या सुरक्षित असल्या पाहिजेत. ती सुरक्षा तुम्ही दिली पाहिजे. त्यांना लाडकी बहीण योजनेची नव्हे तर सुरक्षित बहीण योजनेची गरज आहे. त्यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार, हे महाराष्ट्र पाहणार आहे, असे योगेश चिले यांनी व्हीडिओत म्हटले आहे.

दरम्यान, उरणमधील येथील 22 वर्षीय तरूणी यशश्री शिंदे 25 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. तिचा शोध सुरू असतानाच तिचा छन्नविछिन्न झालेला मृतदेह सापडला. आरोपीने यशश्रीच्या चेहऱ्यावर,शरीरावर आणि गुप्तांगावर धारदार शास्त्राने वार करून तिची निर्घृण हत्या केली होती. रक्ताच्या थारोळ्यात मुलीचा मृतदेह पडला असून कुत्रे तिच्या शरीराचा चावा घेत होते. कुत्र्यांमुळे मुलीचा चेहरा विद्रुप झाला होता. तिच्या मासं देखील कुत्र्यांने खाल्ले होते. तिच्या चेहऱ्यावर,शरीरावर आणि गुप्तांगावर वार होते. यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात दाऊद शेख नावाच्या व्यक्तीवर हत्या केल्याचा आरोप केला आहे.