शिवाजी महाराजांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या ‘श्रीपाद छिंदमचे’ नगरसेवक पद रद्द

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बेताल वक्तव्य केल्यामुळे वादात अडकलेला अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमला न्यायालयाने चांगलीच अद्दल घडवली आहे. महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी नगरविकास विभागाने छिंदमवर कारवाई केली असून त्याचे नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे. यासंदर्भातील निकाल नगरविकास विभागाने  शुक्रवारी दिला.

 छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी छिंदमवर कारवाई करण्यासंदर्भात नगरविकास विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवर गुरुवारी सुनावणी होणार होती. या सुनावणीला छिंदमला उपस्थित राहून आपली बाजू मांडण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र छिंदम या सुनावणीला उपस्थित राहिला नाही. त्यानंतर आजच्या सुनावणीलाही छिंदम अनुपस्थित होता. अखेर आज छिंदमला मुदतवाढ न देता किंवा त्यांची वाट न पाहता नगरविकास विभागाने आपला निकाल सुनावला.

महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये महापुरुषांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही. महापुरुषांच्या नावाने राज्याच्या प्रशासनाचे काम चालते. असं असतानाच लोकप्रतिनिधींकडून महापुरुषांबद्दल अशाप्रकाराची वक्तव्य केली जात असतील तर त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो असं निकालादरम्यान नगरविकास विभागाने स्पष्ट करत छिंदमचे नगरसेवक पद काढून घेण्याचा निर्णय दिला.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.