Maharashtra News : महत्वाची बातमी ! भटक्या जमातीमध्ये नव्या जातींचा समावेश ; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra News : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी (७) मंत्रिमंडळाची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत विविध विभागाअंतर्गत महत्वपूर्ण असे १२ निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील यादीमध्ये नवीन जातींचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर यामध्ये काही जातींना वगळण्यात देखील आले आहे. यामध्ये कोणत्या (Maharashtra News) जातींचा समावेश करण्यात आला आहे चला पाहूया…

ठेलारी (Maharashtra News)

राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार ” ठेलारी” ही जात ‘भटक्या जमाती (ब)’ यादीतील अ.क्र. २७ येथून वगळून ‘भटक्या जमाती (क)’ यादीतील अ.क्र.२९ मध्ये धनगर जातीची तत्सम जात म्हणून समावेश करण्यात आला आहे.

केवट-तागवाले (Maharashtra News)

केवट-तागवाले या जातीचा भटक्या जमाती (ब) मध्ये समावेश करण्यात आला आहे. आयोगाच्या शिफारशीनुसार इतर मागासवर्ग यादीतील अ. क्र. १८२ मधील माळी, बागवान, राईन (बागवान) समोर कुंजडा या जातीचा समावेश करण्यात आला आहे.

चूनेवाले

आयोगाच्या शिफारशीनुसार सरकारने इतर मागास वर्ग यादीतील अ.क्र.२६७ वर समावेश असलेल्या चुनारी (Maharashtra News) जातीसमोर चूनेवाला, चूनेवाले या जातींचा समावेश केला आहे.

हडगर

“हडगर” या जातीचा समावेश ‘विशेष मागास प्रवर्ग’ यादीतील अ.क्र. ३ (१) कोष्टी जातीची (Maharashtra News) तत्सम जात म्हणून समावेश करण्यात येत आहे.

वंजारी

वंजारी या मुख्य जातीची लाड वंजारी ही पोटजात म्हणून भटक्या जमाती (ड) क्रमांक (३०) मध्ये समावेश करण्यात येत आहे.

भोयर

इतर मागास प्रवर्गातील अ.क्र. २२६ वरील “भोयर” या जातीची आजमितीस असलेली दुबार नोंद वगळण्यात येत आहे, असे शासन आदेशात म्हटले आहे.

दरम्यान ठेलारी या जातीचा धनगर जातीमध्ये समावेश करण्यात आल्यामुळे (Maharashtra News) धनगर समाज संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे मंत्रालयात जाऊन भेट घेऊन त्याबद्दल आभार व्यक्त केले.