गुड न्यूज! ‘या’ कंपनीने बनवले कोरोनावर औषध; एका इंजेक्शनची किंमत ८ हजार रुपये आहे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या संक्रमणाला रोखण्यासाठी विविध उपायांसोबत कोरोनावरील औषधासाठी देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. या विषाणूला रोखणारे कोणतेच हमखास औषध अद्याप उपलब्ध झालेले नाही आहे. सध्या अनेक प्रकारची औषधे कोरोनासाठी वापरली जात आहेत. आता बायोकॉन कोरोनावर एक नवीन औषध आणत आहे. हे औषध म्हणजे सर्वांसाठी एक दिलासादायक बाब आहे. बायोटेक्नोलॉजी क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या बायोकॉनने इटोलीझुमॅब हे इंजेक्शन बाजारात आणणार असल्याचे जाहीर केले आहे. या औषधाच्या एका इंजेक्शनची किंमत ८ हजार रु असणार आहे. इटोलीझुमॅबच्या एका इंजेक्शनची किंमत ७,९५० रुपये आहे. बहुतांश रुग्णांना चार इंजेक्शनची गरज भासेल. एकूणच या थेरपीची किंमत ३२ हजार रुपये आहे.

COVID-19 ची सामान्य ते गंभीर लक्षण असणाऱ्या रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली आहे. बायोकॉनला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून इटोलीझुमॅब इंजेक्शनसाठी मंजुरी मिळाली आहे. जगात पहिल्यांदाच इटोलीझुमॅबच्या रुपाने बायोलॉजिक थेरपीला मंजुरी देण्यात आलीय असे बायोकॉनकडून सांगण्यात आले आहे. करोना व्हायरसची मध्यम ते गंभीर स्वरुपाची लक्षणे असलेल्या, श्वासोश्वास करण्यास त्रास होत असलेल्या रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात येईल.

आता सर्वसामान्यांच जगणं मुश्किल करणाऱ्या कोरोना विषाणूवर या औषधामुळे आणखी एक औषध लाँच झाले आहे.  “कोरोनावर लस येईपर्यंत आपल्याला प्राण वाचवणाऱ्या औषधांची गरज आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत किंवा पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला आपल्याला लस मिळाली तरी पुन्हा इन्फेक्शन होणार नाही, याची कुठलीही खात्री नाहीय. आपल्याला अपेक्षित आहे, तसेच ती लस काम करेल याची कुठलीही खात्री नाहीय. त्यामुळे आपल्याला तयार राहिले पाहिजे” असे बायोकॉनच्या प्रमुख किरण मुझूमदार शॉ म्हणाल्या आहेत.