मंञी महोदयांमुळेच २० वर्षे हणबरवाडी धनगरवाडी योजना रखडली – मनोज घोरपडे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

मंञी महोदयांनी हणबरवाडी धनगरवाडी योजनेबद्दल खोटी जाहिरात चालवली असून २० वर्षे ही योजना तुमच्यामुळेच रखडलेली आहे असा पलटवार कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे यांनी प्रसिद्धी पञकाव्दारे केला आहे. घोरपडे यांनी यावेळी राज्याचे सहकार व पनण मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यावर ताशेरे ओढलेत.


गेली २० वर्षे योजना भाजपाने रखडवली असे म्हणता पण २० वर्षे आपण स्वतः आमदार आहात. गेली १५ वर्षे आपलेच सरकार असताना योजनेला आपण निधी का आणू शकला नाही ? किंवा योजना का चालू केली नाही ? असा प्रश्न विचारत घोरपडे यांनी हे अगोदर लोकांना सांगा असं आवाहन पाटील यांना केलेय. आपण म्हणता भाजपने योजना रखडवली परंतु केवळ ५ वर्ष भाजपच्या काळात मी स्वतः प्रयत्न करून निधी आणला म्हणूनच तर आता काम चालू आणि जसे काम पूर्ण होईल तसा निधी मिळणार आहे असं म्हणत आयत्या पिठावर रेघोट्या मारणे बंद करा असं घोरपडे यांनी म्हटलंय.

तसेच, सध्या आपण सहकार मंञी आहात. सरकार पण तुमचेच आहे. नवीन निधी मंजूर करून आणा. केवळ प्रसिद्धी व नारळ फोडण्यासाठी खोटे बोलू नका असे अवाहन मनोज घोरपडे यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook