अजितदादांकडून पोलिसांचं कौतुक; म्हणाले, ‘तुमचा अभिमान वाटतो’

पुणे । मागील ३ महिन्यांपासून अविश्रांत काम करणाऱ्या पोलीस दलाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले. पुणे शहर पोलीस आयुक्तालयात पोलिसांनी लॉकडाऊन काळात केलेल्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, जवळपास तीन महिने झाले तुम्ही सतत ड्युटीवर आहात. गणेशोत्सव, दिवाळी, मोहरम यादरम्यान ड्युटी केल्यानंतर आराम … Read more

पुण्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ; दिवसभरात सापडले २६८ नवीन रुग्ण

पुणे । राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. आज दिवसभरात राज्यात ३६०७ रुग्णांची अर्थात आतापर्यंतच्या सार्वधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आज पुण्यातही मोठ्या संख्येत रुग्णांना कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. आज दिवसभरात पुण्यात २६८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच सात रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली … Read more

आता आळंदीही कंटेन्मेंट झोन म्हणुन जाहीर; वारकर्‍यांत चिंता

पुणे । संत ज्ञानेश्वर यांचे समाधीस्थळ अर्थात आळंदी हे तीर्थक्षेत्र होय. आळंदी येथे कोरोनाने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वरांच्या पादुकांच्या प्रस्थान सोहळ्याला आता दोनच दिवस राहिले आहेत. दिनांक १३ जुनला ज्येष्ठ वद्य अष्टमीला हा सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर आळंदीतही धर्मशाळा, मठ आणि लॉजमध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध करण्यात आला आहे. … Read more

पुण्यात ४७ कोटी रुपयांच्या नकली नोटा जप्त; आर्मी जवानासह ६ जणांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बनावट नोटांचा कारभार करणारे एक रॅकेट नुकतेच पुणे येथे उघडकीस आले आहे. बुधवारी “चिल्ड्रेन्स बँक ऑफ इंडिया”च्या नावाची डमी बिले आणि यूएस डॉलरसह सुमारे ४७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा) बच्चन सिंह यांनी याविषयी सांगितले की, या प्रकरणात भारतीय सैन्याच्या एका शिपायासह सहा जणांना … Read more

…म्हणून पुणे विद्यापीठाने अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याची तयारी केली सुरु

पुणे । राज्यातील पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्र परीक्षा रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र तसा लेखी आदेश अद्याप न आल्याने पुणे विद्यापीठाने परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबत माहिती देताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी म्हणाले की, “८ मेच्या राज्य शासनाच्या आदेशामध्ये अंतिम वर्ष वगळता बाकी वर्षांची … Read more

पुण्यातील डाॅक्टरांकडून नागरिकांची लुटमार; हेल्थ सर्टीफिकेटसाठी आकारला जातोय आव्वाच्या सव्वा दर

पुणे । सध्या राज्यात मोठ्या शहरांमध्ये लाखो स्थलांतरित कामगार अडकले आहेत. जे आपल्या घरी परतण्याची वाट बघत आहेत. राज्य शासनाने अशा कामगारांना आपल्या घरी जाता येईल असे जाहीर केल्यापासून अनेक कामगार घरी जाण्याची आशा ठेवून आहेत. त्यांना या प्रवासासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. हे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी कामगारांच्या रांगा सध्या सरकारी व खाजगी … Read more

चिंता वाढली! पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १० हजार पार

पुणे । पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १० हजारच्या पुढंं गेला आहे. पुणे शहरासह विविध तालुक्यांमध्ये मागील १२ तासांत ५३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या मंगळवारी रात्रीपर्यंत ९ हजार ९५९ होती. त्यानंतरच्या १२ तासांत पुणे शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत मिळून ५३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळं रुग्णसंख्येनं १० हजारांचा टप्पा ओलांडला … Read more

पिंपरी चिंचवडमध्ये ऑनर किलिंग; प्रेमप्रकरणातून एका २० वर्षीय तरूणाचा निर्घृण खून

पुणे । शहरात प्रेमप्रकरणातून एका २० वर्षीय तरूणाचा खून झाला आहेविराज विलास जगताप असं या २० वर्षीय तरूणाचं नाव आहे.हा खून मुलीच्या कुटुंबातील ६ जणांनी केला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे मुलीच्या कुटुंबातील सहा जणांनी हल्ला केला. ही घटना रविवारी रात्री घडली आहे. या घटनेमुळे शहरात संतापाच वातावरण आहे. मारेकऱ्यांमध्ये मुलीचे वडिल, काका, सख्या आणि … Read more

विद्यार्थी संघटनांची राज्यपालांकडे भेटीची मागणी; भाजपाच्या प्रत्येक नेत्याला भेटणारे राज्यपाल विद्यार्थ्यांना भेटणार का?

पुणे | राज्यात करोना मुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने शेवटच्या वर्षांच्या परीक्षा सोडून बाकी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यात भर टाकून राज्य सरकारने शेवटच्या वर्षाच्याही परीक्षा विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी करत रद्द केल्या. मात्र या निर्णयाला राज्यपालांनी मान्यता न देता शेवटच्या वर्षाच्या परीक्षा घ्याव्या लागतील असे सरकारला पत्र लिहून कळविले आहे. … Read more

पुण्यातील भुशी डॅमसह जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळे बंदच राहणार – जिल्हाधिकारी 

पुणे । राज्यात आता मान्सूनचे वेध लागले आहेत. पुढच्या दोन तीन दिवसात पाऊस कोसळण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. संचारबंदीचे नियमही शिथिल करण्यात आले आहेत. अनेकांनी या सर्व परिस्थितीमुळे पर्यटन स्थळांना भेटी द्यायचे नियोजन केले असेल. सामाजिक अलगाव राखत जिल्ह्यातील डॅमना भेटी द्यायचे नागरिकांचे नियोजन यावेळी होऊ शकणार नाही. कारण तसे नियोजन करण्यासाठी जिल्ह्यातील कोणत्याच … Read more