उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण

पुणे । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कणकण आणि थोडासा ताप जाणवत होता. त्यामुळे त्यांना कोरोनाची चाचणी केली होती. त्याच्या या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रांनी यासंदर्भात बातमी दिली आहे. (Deputy CM Ajit Pawar tested Corona Positive)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मागील काही दिवसांपासून कणकण आणि थोडासा ताप आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कोरोना चाचणी केली होती. सुरुवातीला त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता, मात्र पुन्हा त्यांची स्वॅब चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रांनी यासंदर्भात वृत्त दिलं आहे. मात्र अद्याप अजित पवारांनी याबाबतची कोणतीही माहिती दिलेली नाही.

दरम्यान, कोरोना काळात प्रशासकीय काम करताना अनेक दौरे आणि बैठकांमध्ये अजित पवार विशेष काळजी घेत आले आहेत. बैठकांमध्ये सोशल डिस्टंसिंग आणि सर्वानी मास्क घातले आहे कि नाही यावर त्यांच्या नेहमीच कटाक्ष राहतो. या कोरोना काळात अनेक ठिकाणी भेटी देतांना मास्क न वापरणाऱ्या किंवा व्यवस्थित न घातलेल्या अधिकारी, कर्मचारी, नागरिकांना अजित पवार ताकीद देताना पाहायला मिळाले. कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्यावर त्यांचा भर राहिला आहे.

दौरा आटोपून परतल्यानंतर जाणवत होती कणकण
अजित पवारांनी शनिवारी बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती. अजित पवारांनी शनिवारी सकाळी बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी केली. अजित पवार हा दौरा आटोपून परतल्यानंतर, त्यांना कणकण जाणवत होती. तसेच तापही आला होता. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. त्यातील एका चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र आणखी एक चाचणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्यामुळेच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पुढे ढकलल्याची माहिती आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in