अखेर पुण्यात कंटेन्मेंट झोन वगळून दारूची दुकान उघडायला परवानगी

पुणे । राज्य सरकारनं अटी-शर्तींसह रेड झोनमध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमधील कन्टेंन्मेंट झोन वगळून मद्यविक्रीस परवानगी दिल्यानंतरही पुण्यातील मद्यविक्रीची दुकानं खुली होणार नाहीत, असं राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र, आज जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करून मद्यविक्रीस परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहेत. या आदेशानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील, … Read more

मराठी भाषेच्या विकासासाठी MKCL चं ‘आय.टी.त मराठी’ अॅप

ज्ञानाची देवाण-घेवाण माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी भाषेतून व्हावी, तसेच इंटरनेटवर मराठीचा वापर वाढवून जगभरातील विविध क्षेत्रांतील ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत मराठी भाषेतून उपलब्ध व्हावे, या करिता महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) प्रयत्नशील आहे. त्यासाठी महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून MKCL तर्फे ‘आय.टी.त मराठी’ या अभिनव अॅपची निर्मिती केली गेली आहे.

“कोणीही उपाशी राहू नका, आम्ही आहोत..!!” – पुण्यातील सेवाभावी संस्थांच्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वामी विवेकानंद पतसंस्था अँड वाणी चेंबर्स आँफ कामर्स, कँटलिस्ट फाऊंडेशन, भगवे ट्रेकर्स, वंदेमातरम, आयएएस अँकडमी अँड रिसर्च सेंटर, राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था,बुलढाणा आणि गजानन बुक सेंटर यांच्या मदतीने गजानन बुक सेंटर येथे दररोज सकाळी ८ ते ९ पर्यंत पोहे व उपीट या नाश्त्याचे वाटप केले जाते. तर दुपारी १२ ते १ व रात्री ७:३० ते ८:३० या वेळेत ताजे आणि स्वच्छ जेवण देण्यात येत आहे.

रेड झोनमधील मद्यपींसाठी खुशखबर! कंटेन्मेंट क्षेत्र वगळता दारूची दुकानं खुली होणार?

मुंबई । लॉकडाऊनच्या काळात रेड झोनमध्ये कन्टेंन्मेट क्षेत्र वगळता उर्वरित भागांत स्वतंत्र दुकानांसह दारुची दुकानंही खुली होणार आहेत. राज्य सरकारनं यासंबंधी निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळं मद्यप्रेमींना दिलासा मिळाला आहे. एएन आय या वृत्तसंस्थेने यासंबंधी वृत्त दिले आहे. Maharashtra government has decided to allow standalone shops including liquor shops to open in Red … Read more

लॉकडाऊन लग्न! चक्क बाप म्हणून पोलिसांनीच केलं कन्यादान

पुणे । सध्या संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळं राज्यासह देशात लॉकडाऊन लागू आहे. लॉकडाऊनचा दुसरा टप्पा पूर्ण होण्याच्या एकदिवसआधीच लॉकडाऊनमध्ये आणखी दोन आठवड्यांची वाढ करण्यात आली. या वाढत्या लॉकडाउनच्या कालावधीचा सर्वात जास्त भावनिक फटका कोणाला बसत असेल तर तो म्हणजे लग्न जमलेल्या जोडप्यांना. लॉकडाउनच्या कालावधीत सर्व काही बंद त्यात सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी … Read more

पावसात सुद्धा ड्युटी बजावणाऱ्या पुणे पोलिसांचा ‘तो’ व्हिडिओ पाहून महापौर भारावले, ठोकला कडक सेल्युट

पुणे । हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार काल शुक्रवारी दुपारी चारच्या दरम्यान वादळी पावसाने पुणे शहराला झोडपले. सोसाट्याचा वारा, मेघगर्जनेसह पडलेल्या पावसामुळे शहराच्या विविध भागात झाडे पडली तर काही ठिकाणी मोबाइल टॉवर, दिशादर्शक फलक कोसळले. उपनगरांमध्ये रस्त्यावर पाणीही साठले होते. लॉकडाऊनमुळे लोक घरात असल्याने जीवितहानी टळली. मात्र याच लोकडाऊनमध्ये पुणे शहर पोलीस भर मुसळधार पावसात सुद्धा … Read more

‘याठिकाणी असं..केल्यानं’ बारामती कोरोनामुक्त झालं- अजित पवार

पुणे । काल पुण्याच्या ससुन हॉस्पिटलमधून कोरोनाची लागण झालेल्या ७५ वर्षीय बारामतीतील अखेरच्या रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्याने बारामती शहर सध्या करोनामुक्त झालं आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनामुक्त बारामतीचं सर्व श्रेय कोरोनाविरोधातील लढ्यात हातभार लावणाऱ्या प्रत्येकाला दिलं. “बारामतीकरांनी ‘लॉकडाउन’चे सर्व नियम काटेकोरपणे पाळल्यामुळेच हे शक्य झालं” असं अजित पवार यांनी नमूद केलं. … Read more

३ मेनंतर मुंबई, पुणे, ठाण्याची लॉकडाऊनमधून सुटका नाहीच- उद्धव ठाकरे

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन ३ मे रोजी संपत असून यानंतर लॉकडाउन वाढवला जाणार की शिथील करणार यासंबंधी चर्चा सुरु आहे. अशा वेळी लॉकडाउनमधून मुंबई, ठाणे, पुणेकरांना दिलासा दिला जाणार नसल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधताना दिले. ३ मेनंतर राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे हे रेड झोन वगळता इतर … Read more

पुणे जिल्ह्यातून गावी जाण्यासाठी ‘पास’ पाहिजे? येथे करा संपर्क

पुणे । लाॅकडाऊन कालावधीत बेघर, विस्थापित कामगार, परराज्यातील अडकलेले कामगार, पर्यटक, विद्यार्थी यांना त्यांच्या मुळगावी पाठविणेबाबत आदेश आदेश जारी करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग मंत्रालयकडून काल ३० एप्रिलला याबाबतचा आदेश दिले आहेत. सदर आदेशानुसार परराज्यातील स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या मुळ गावी जाण्याची इच्छा असल्यास महाराष्ट्र शासनाने आवश्यक त्या उपाय योजना करुन कामगारांना मुळ … Read more

गरजू पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी ‘रिलीफ पुणे’ वेबसाईट ठरतेय वरदान

पुणे पिंपरी-चिंचवड भागामध्ये लाॅकडाऊनमुळे अडकून पडलेल्या व्यक्तींपर्यंत मदत पोचावी यासाठी काही तरूण इंजिनियर आणि डाॅक्टरांनी एकत्र येऊन गरजू, प्रत्यक्ष मदतकार्य करणारे आणि देणगीदार यांच्यासाठी एकत्रित reliefpune.in नावाची वेबसाईट सुरू केली आहे.