मराठमोळे मनोज नरवणे होणार नवे लष्करप्रमुख; जनरल बिपीन रावत ३१ डिसेंबरला निवृत्त होणार

नवीन लष्करप्रमुख निवडताना सेवाज्येष्ठतेचाच विचार करण्याचा निर्णय केंद्र सरकार व संरक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थ समितीने केला आहे. त्यामुळे मराठी मुलुखातील मूळ पुण्याचे असलेल्या लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे हेच आता देशाचे पुढील लष्करप्रमुख असतील.

अखेर फिरोदिया करंडक साठी विषय निवडीचे निर्बंध मागे

स्पर्धेच्या आयोजकांकडून जात, धर्म व्यवस्था, काश्मीर ३७०, भारत-पाक, हिंदू-मुस्लीम, राम मंदिर-बाबरी मशीद या विषयांवर एकांकिका सादर न करण्याचे निर्बंध घालण्यात आले होते. 

पंकजांनी केलेलं भाषण हे भाजपाच्या सच्चा कार्यकर्त्यास दुखवणारं; खासदार काकडेंची पंकजा मुंडेंवर घणाघाती टीका

काल गोपीनाथगडावर पंकजांनी केलेलं भाषण हे भाजपाच्या सच्चा कार्यकर्त्यास दुखवणारं असल्याच सांगत, ज्याला आपला मतदारसंघ सांभाळता येत नाही, ते महाराष्ट्रात काय फिरणार व काय दिवे लावणार? असं म्हणत खासदार काकडेंनी पंकजा यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.

चिखलीत पुन्हा एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या गस्तीवर प्रश्न चिन्ह

एटीएम फोडण्याचे दोन प्रकार उघडकीस आल्यानंतर, सर्व पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना रात्रीच्या वेळी एटीएम सेंटरची पाहणी करण्यासाठी संयुक्त पथक नियुक्त केले. मात्र तरी देखील शहरात सहा एटीएम फोडण्याचे प्रकार घडले आहेत. 

पुणे जिल्ह्यामधील 750 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना सुरू; डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश

प्रभाग रचनेचे काम जलदगतीने करून 30 डिसेंबर २०१९ पर्यंत प्रभाग रचना निश्‍चित करण्यात याव्यात अशा सूचनानिवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण १ हजार ४०० ग्रामपंचायती आहेत. त्यापकी निम्म्या म्हणजे ७०० ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर २०१९ पर्यंत संपणार असून, त्यांच्या निवडणुकीची तयारी सुरु करण्यात अली आहे

अ.भा.वि.प च्या ५४ व्या अधिवेशनाची पुण्यात जय्यत तयारी

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५४ वे अधिवेशन येत्या २८ तारखेला होत असून त्याची जय्यत तयारी आतापासूनच सुरू आहे. मुकुंदनगरमधील सपंजो आश्रमाची जागा येथील स्थानिक रहिवाशांनी एक महिन्याकरिता मोफत उपलब्ध करून दिली आहे.

मुलीच्या लग्नाच्या आदल्यादिवशी बापाचं घर जळून खाक; लग्नाच्या साहित्याची झाली राख

अवघ्यां २ दिवसांवर मुलीचे लग्न आल्याने सयाजी मधे यांनी सर्व साहित्य खरेदी करून घरात आणून ठेवले आणि नियतीने घाला घातला. या लागलेल्या आगीत लग्नाचे सर्व साहित्य जाळून खाक झाले आहे.

पिंपरीतून महामेट्रोच्या साहित्यावर डल्ला; एका महिन्यानंतर गुन्हा दाखल

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे काम जलदगतीने सुरु आहे. काही ठिकाणचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम सुरु असताना चोरटयांनी या मेट्रोच्या साहित्यावरच डल्ला मारायला सुरवात केली आहे. 

पत्नीशी शाररीक संबंध नाकारणाऱ्या पतीवर गुन्हा

नऊ महिने होऊन देखील पतीने शारीरिक संबंध न ठेवल्याने अखेर पत्नीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. शाररिक सुखापासून वंचित ठेवणाऱ्या पतीच्या विरोधात पत्नीने चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

दारूच्या नशेत विजेच्या खांबावर चढला अन…

दारूच्या नशेने अनेकांचे संसार उध्वस्थ झाल्याचे आपण पहिले आहे. नशेत असताना अनेकांनी निष्पाप लोकांचे बळीही घेतले आहेत. तर काही जण स्वतःच्या जीवाला मुकले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे