अजित पवारांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला – गिरिश बापट

शनिवारी सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली . तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली . या राजकीय पालटवारने महाराष्ट्रात एकच खळबळ माजवली . भाजपने सत्ता स्थापन केल्या नंतर पुण्यातखासदार गिरीश बापट आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भारावून जल्लोष साजरा केला .

दिवेघाट अपघातातील वारकऱ्यांना अद्याप मदत नाही

नामदेव पालखी सोहळ्यात जेसीबी घुसल्याने दिवेघाटात झालेल्या अपघातातील जखमींवर उपचार केले जातायत, मात्र  शासनाने देऊ केलेली आर्थिक मदत अजूनही न पोचल्याने वारकऱ्यांना अडचणी येत असल्याची बाब समोर आली आहे. 

यंदाचा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ ११ डिसेंबर पासून; पाच दिवस असणार कार्यक्रम 

पुणे प्रतिनिधी । दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या  ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ यंदा ११ ते १५  डिसेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्र क्रीडा संकुल येथे होणार आहे. या महोत्सवाचे हे ६७ वे वर्ष आहे.  दरवर्षी प्रमाणे यंदाही या महोत्सवात दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहे.  या महोत्सवाची सुरवात जेष्ठ गायक पं. फिरोज दस्तूर यांचे शिष्य गिरीश संझगिरी यांच्या … Read more

दिवेघाटात जेसीबी दिंडीत घुसला, नामदेव महाराजांच्या वंशजाचं दुःखद निधन

पंढरपूरवरुन आळंदीकडे येणाऱ्या नामदेव महाराजांच्या पालखी दिंडीला मंगळवारी सकाळी भीषण अपघाताला सामोरं जावं लागलं. या अपघातात २ जण ठार, २ जण गंभीर जखमी तर १५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. दिवेघाटात झालेल्या या अपघातात नामदेव महाराजांचे वंशज सोपान महाराज नामदास, वय ३६ हे जागीच ठार झाले आहेत. त्यांचे सहकारी अतुल महाराज आळशी, वय २४ यांनाही आपला जीव या अपघातात गमवावा लागला आहे. या अपघातात जेसीबीचंही मोठं नुकसान झालं आहे.

‘जंजीर आज भी जिंदा है!’ १९९३ मुंबई बॉम्बस्फोट तपासात बजावली महत्वाची भूमिका

 भारत माझा देश आहे…? सारे भारतीय माझे बांधव आहेत…? माझ्या देशावर माझे प्रेम आहे…? माझ्या देशातल्या समृध्द आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे…?आपली हि प्रतिज्ञा पुन्हा एकदा पडताळून पहायला हवी अशी आजची परिस्थिती आहे. व्यवस्थित या प्रतीज्ञेकडे लक्ष दिल्यास असे लक्षात येईल कि, प्रत्येक विधानामागे एक अदृश्य प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आठवतात ते जेष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज. ते एका ठिकाणी म्हणतात ” धर्माचा ध्वज धर्मांधांच्या खांद्यावर जातो, तेव्हा वाहते ते त्याच धर्माचे असते व मग उकिरड्यावरचे कागद खाणारे गाढव जसे मनाचे श्लोक व मटक्याचे आकडे यात भेद करीत नाही तशी स्थिती अस्तित्वात येते “

हिंदुस्थानातं चमच्यांची सुद्धा कमतरता पडली आहे का?- नितीन गडकरी

‘देशभरातील उद्योग व्यवसायसंबंधी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी चीनमधून उदबत्तीपासून प्लास्टिकचे चमचे देखील आपल्या देशात आयात केले जात आहे. ही माहिती मिळाली, त्यावरून मी सेक्रेटरीला म्हटलो की, अपने हिंदुस्थान में चमचो की भी कमी पड गई क्या?’ असा किस्सा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

लेडीज वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा, मुलींचे अश्लिल चित्रिकरण

पुणे प्रतिनिधी | पिंपरी चिंचवड येथील एका हाॅटेलमध्ये मुलींचे अश्लिल चित्रिकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उच्चभ्रू हाॅटेल मधील वाॅशरुममध्ये छुपा कॅमेरा लावून मुलींचे अश्लिल व्हिडिओ शुट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत हाॅटेलमालकाने पोलिसात तक्रार केल्यानंतर कर्मचार्‍याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज-1 परिसरातील उच्चभ्रू … Read more

श्रीमती हीराबेन नाणावटी इंस्टिट्यूटमध्ये ‘बुकशेल्फ २०१९’ स्पर्धेचे आयोजन

पुणे प्रतिनिधी । विद्यार्थिनींमध्ये वाचन आणि संशोधन संस्कृती वृधींगत व्हावी यासाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या हीराबेन नाणावटी इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च फॉर वुमेन संस्थेमध्ये नुकतेच ‘बुकशेल्फ २०१९’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण १८३ विद्यार्थिनींनी स्पर्धेत उपस्थिती नोंदवली होती. या स्पर्धेसाठी विद्यार्थिनींनी पोस्टर्स, मॉडेल्स, पुस्तक परिक्षण व पी.पी.टी. चे सादरीकरण केले. विद्यार्थिनींमध्ये वाचन … Read more

बाळासाहेब थोरात यांनी घेतली शरद पवारांची भेट; सत्तास्थापनेच्या दृष्टीने खलबत सुरु

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आज शरद पवार यांची भेट घेण्यासाठी बारामतीमध्ये पोहोचले आहेत. आगामी राजकीय समिकरणांच्या दृष्टीने थोरात पवार भेटीला अधिक महत्व प्राप्त झालंय.

२०१९ विधानसभा निवडणूकीचा खराखुरा निकाल पहा फक्त इथेच..!!

आज विधानसभा निवाडणुकांचा निकाल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल.