स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची फडणवीस सरकारविरुद्ध नाराजी; भ्रष्टाचारी महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी

चालू सरकारच्या काळात स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागा कमी होणे, परीक्षांचे निकाल वेळेवर न लागणे, परीक्षा उत्तीर्ण होऊनसुद्धा पोस्टिंग न मिळणे, परीक्षा घेणाऱ्या वेबसाईटमध्ये त्रुटी असणे या मूलभूत अडचणींना विद्यार्थ्यांना तोंड द्यावं लागत आहे. विद्यार्थ्यांनी वारंवार आंदोलन करूनही त्यांना याप्रश्नी न्याय मिळाला नाही.

राज्यात १३ ऑक्टोबरपासून मोदींचा प्रचारदौरा; ९ ठिकाणी होणार ‘मोदीगर्जना’

विधानसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून राज्यात त्यांच्या नऊ प्रचार सभा होणार आहेत.

‘मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा नाही’ – चंद्रकांत पाटील

‘निवडणुकीपूर्वी पक्षाने राज्यातील सर्व जागांचे सर्वेक्षण केले होते. त्या सर्वेक्षणानुसार कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, असे मला सांगण्यात आले. निवडणूक लढवीत असलो तरी मुख्यमंत्रिपदाची कोणतीही अपेक्षा मला नाही,’ असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केले.

पिंपरीमधील महायुतीच्या उमेदवाराचे ‘फेसबुक अकाऊंट हॅक’; सायबर क्राईम पोलिसात तक्रार दाखल

पिंपरी मतदारसंघामधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढाणारे विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांचे अधिकृत फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सायबर क्राईम पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे. अगोदर चाबुकस्वार यांनी फेसबुकच्या अकाऊंटशी संलग्न असणारे मोबाईल क्रमांक, मेल आयडी हॅक झाले. त्यानंतर त्यांचे अकाऊंटच डिलीट झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमागील सूत्रधार कोण आहे याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. चाबुकस्वार यांचे स्वीय सहाय्यक विजय जगताप यांनी सायबर क्राईममध्ये या घटनेची माहिती देत तक्रार दाखल केली आहे. घटनेचा तपास सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

काश्मीरचं वादळ आज महाराष्ट्राला धडकणार; नामग्याल विरुद्ध ठाकरे जुगलबंदी रंगणार

पुण्यात आज राजकीय धुमश्चक्री होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मंगळवारीच पुण्यात दाखल झाले आहेत. उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचं उद्घाटन केल्यानंतर आज राज ठाकरेंची सभा आज पुण्यात होत आहे. दुसरीकडे चंद्रकांतदादा पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत ज्यापद्धतीने भाजपने बालाकोट मुद्दा उपस्थित केला होता, त्याच धरतीवर विधानसभा निवडणुकीत काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. लडाखमधील जामयंग त्सेरिंग नामग्याल या खासदाराला सोबत घेत भाजपच्या वतीने पुण्यात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

फोटोग्राफर बनणार का आमदार? संघर्षमय परिस्थितीत लढणाऱ्या किशोर तुपारेंची लढत लक्षवेधी

पुण्यात मात्र बहुजन मुक्ती पक्षाने वेगळा मार्ग अवलंबत अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या पुणे कँटोनमेंट विधानसभा मतदारसंघातून फोटोग्राफी करणाऱ्या माणसाला उमेदवारी दिली आहे. किशोर बाजीराव तुपारे असं या उमेदवाराचं नाव आहे. तुपारे हे मूळचे अकोला जिल्ह्यातील असून पुण्याच्या महर्षीनगर परिसरातील मीनाताई ठाकरे झोपडपट्टीत राहतात. तुपारे यांचा जन्म १९७७ सालचा. १९९० साली पुण्यात आलेल्या तुपारे यांनी कुटुंबियांच्या पाठिंब्यावर गुलटेकडी, डायस प्लॉट, महर्षीनगर आदी भागात फोटोग्राफीचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांचा ठामपणे सामना करत त्यांनी अल्पावधीतच व्यवसाय भक्कम केला. सासरे आणि पत्नी यांच्या पाठिंब्यावर त्यांनी व्यवसायात अपेक्षित यश मिळवलं. उच्च शिक्षण घेऊन त्यांनी वकील होण्याचं स्वप्न पाहिलं होतं मात्र बेताच्या परिस्थितीने त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. एवढं असतानाही समाजकारणाची कास त्यांनी सोडली नाही.

तुपारे हे सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून भारत मुक्ती मोर्चा संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं

कोथरूडची लढाई ही नेता विरुद्ध कार्यकर्ता अशीच; इथल्या निवडणुकीत काश्मीर कशाला पाहिजे? – किशोर शिंदे

कोथरुडची निवडणूक ही स्थानिक विरुद्ध बाहेरचा अशीच असणार आहे. भाजपचा उमेदवार आजही कोथरूडमध्ये घर घेण्यासाठी धडपडत आहे. अशा परिस्थितीत ज्या माणसाला कोथरुड नक्की काय आहे हेच माहीत नसेल तो इथल्या लोकांमध्ये कसा मिसळणार असा सवाल करत – यंदा कोथरूडमध्ये १०० टक्के परिवर्तन होणार असा विश्वास मनसेचे कोथरुड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार किशोर शिंदे यांनी व्यक्त केला. हॅलो महाराष्ट्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

चंद्रकांतदादांचं चाललंय काय ?? काश्मीरची बोंब मारल्याशिवाय जमतच नाय??

काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाचा भावनिक मुद्दा कोथरूडमधील जनतेपुढे मांडण्यासाठी लडाखमधील एकमेव खासदार जमयांग त्सेरिंग नामग्याल यांना खास पुण्यात बोलावण्यात आलं आहे.