Sunday, April 2, 2023

अंबाबाई मंदिरात कोरोना व्हायरसची दक्षता ; पर्यटक भाविकांसाठी स्टेरेलीयम लिक्विडचा वापर

- Advertisement -

कोल्हापूर | सतेज औंधकर

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षेच्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत . सुट्टीत भाविक पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांना कोरोना व्हायरसच्या संरक्षणासाठी खबरदारीचा उपाय म्हणून स्टेरेलियम लिक्विडचा वापर करण्यास सुरुवात केलीय.

- Advertisement -

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्वाचं पीठ म्हणून करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची जगभर ओळख आहे. अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी देशभर आतूनच नव्हे तर जगभरातून हजारो भाविक कोल्हापुरात येत असतात. सध्या मुलांच्या परीक्षांचा कालावधी सुरू आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या त्या तुलनेत कमी आहे. परंतु ह्या आठवड्यात बहुतांश परीक्षा संपत असल्याने पर्यटक भाविकांची गर्दी वाढणार आहे. त्यातच सध्या जगभर कोरूना व्हायरसचा व्हायरस ने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसपासून संरक्षण व्हावं या उद्देशानं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. कोरोना व्हायरसपासून रक्षण व्हावं म्हणून अंबाबाई मंदिराच्या चारही प्रवेशद्वारांवर देवस्थान समितीच्या वतीने स्टेरेलीयम लिक्विडचा वापर केला जात आहे. अंबाबाई मंदिरात येणाऱ्या प्रत्येक पर्यटक भाविकाच्या हाताला हे लिक्विड लावले जात आहे तसेच कोरोना पासून खबरदारी घेण्यास संदर्भातली माहिती पत्रके वितरित केली जात आहेत. जवळपास एक लाखापेक्षा अधिक माहिती पत्रक यावेळी वाटण्यात आली आहेत.

कोरोना व्हायरसपासून संरक्षण व्हावे यासाठी अंबाबाई मंदिरात स्टेरेलीयम लिक्विड चा वापर करण्यात आला तसेच खबरदारीच्या उपाययोजना संदर्भात माहिती देण्यात आली ही बाब आम्हा पर्यटकांच्या दृष्टीने खूप चांगली असल्याच्या प्रतिक्रिया भाविकांनी दिल्या आहेत.

कोरोना व्हायरसपासून संरक्षण व्हावं यासाठी देवस्थान समितीच्या वतीने उपायोजना करण्यात आल्या आहेत तसेच नागरिकांनी देखील स्वतः काळजी घ्यावी असे देखील आवाहन करण्यात येत आहे.