दोस्तीत कुस्ती ; पुण्याच्या या मतदारसंघात लढणार तीन सख्खे मित्र एकमेकांच्या विरोधात

पुणे प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल शुक्रवारी संपली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या लढतीचे बरेचसे चित्र सध्या स्पष्ट झाले आहे. पुणे शहरात एकाच मतदारसंघात सख्खे तीन मित्र एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढत असल्याचे चित्र बघायला मिळाले आहे .त्यामुळे पुणे तिथे काय उणे या म्हणीचा साक्षात्कार विधानसभा निवडणुकीने देखील करून दिला आहे. पुणे कॅटलमेंट बोर्ड … Read more

राजकारणात बी लय स्कोप हाय राव; विधानसभेच्या २८८ जागांसाठी तब्बल ७ हजार ५८४ अर्ज दाखल

महाराष्ट्र विधानसभेसाठी एकूण ५ हजार ५३४ उमेदवारांनी ७ हजार ५८४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

चंद्रकांत पाटलांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचा शड्डू; जिजाऊची ‘ही’ लेक लढणार कोथरुडमधून

मेधा कुलकर्णींना तिकीट नाकारलं जाणं हा महिला वर्गाचा अपमान समजून संभाजी ब्रिगेडने सोनाली ससाणे यांना चंद्रकांत पाटील यांच्यसरोधात उमेदवारी दिली आहे.

पुणेरी पाट्या लावून चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीला पुणेकरांनी केला विरोध

पुणे प्रतिनिधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याच्या उमेदवारीला मेधा कुलकर्णींच्या कार्यकर्त्यांचा विरोध आहे. त्याच प्रमाणे कोथरूड मधील ब्राह्मण वर्गाने देखील त्यांच्या उमेदवारीला विरोध केला असल्याची चर्चा कोथरूड मध्ये जोर धरू लागली आहे. अशा सर्व नाट्यमय हालचाली होत असतानाच आता कोथरूडमध्ये पुणेरी पाट्या देखील झळकल्या आहेत. पुणेरी … Read more

लक्ष्मण जगतापांची अनोखी दहशत, पिंपरी चिंचवडमधून राष्ट्रवादीला उमेदवारच मिळेना

विशेष प्रतिनिधी | पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण हाच बालेकिल्ला आता राष्ट्रवादी काँग्रेसला ‘कोणी उमेदवारी घेता का उमेदवारी’, असं म्हणत हिणवू लागला आहे. या ठिकाणाहून अखेरपर्यंत तगड्या उमेदवारांनी अपक्ष फॉर्म भरले, मात्र कोणीही राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली नाही. माजी आमदार विलास लांडे आणि नगरसेवक दत्ता साने यांनी पक्षाची … Read more

चंद्रकांत पाटलांच्या अडचणी वाढल्या ;मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा

पुणे प्रतिनिधी | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीत पराभूत करण्याचा चंगच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बांधला आहे. याच निर्धारातून काँग्रेस आघाडीने मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अद्याप देखील राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून कोथरूडचा उमेदवार जाहीर झाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस मनसेला … Read more

भाजपचा कसबा ; शिवसेनेचा सवता सुभा ; काँग्रेसची गटबाजी ; बहुरंगी लढत

पुणे प्रतिनिधी | पुणे शहरातील मध्य वस्तीत असणारा कसबा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात भाजपने लोकमान्य टिळकांचे पणतू शैलेश टिळक यांच्या पत्नी मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली आहे. मात्र त्यांची लढत सोपी नाही. कारण त्यांच्या विरोधात उभा राहिलेले सर्वच उमेदवार तगडे आहेत. तर शिवसेने या मतदारसंघात बंडखोरी देखील केली आहे. पुण्याच्या महापौर असणाऱ्या मुक्ता … Read more

मावळ विधानसभा : भाजपच्या बाळा भेगडेंच्या उमेदवारीला बंडाळीचे ग्रहण ; भाजपच्या सुनील शेळकेना राष्ट्रवादीची उमेदवारी

पुणे प्रतिनिधी | भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा पुणे जिल्ह्यातील मावळ विधानसभा मतदारसंघ बंडखोरीच्या कृत्याने चर्चेत येणार आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत बाळा भेगडे यांना उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता असतानाच भाजपने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपचे सुनील शेळके राष्ट्रवादीत गेले आहेत. त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देखील जाहीर केली आहे. भाजपने या आधी मावळ विधानसभा मतदारसंघातून एका … Read more

‘जागर समाज परिवर्तनाचा’ नवरात्रोत्सव विशेषांकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

‘राष्ट्रपिता महात्मा गांधी’ यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून “जागर समाज परिवर्तनाचा” या नवरात्रोत्सव विशेषांकाचा तृतीय वर्ष प्रकाशन सोहळा युवक क्रांती दल महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पार पडला.

पुणे भाजपमध्ये फुटीची चिन्हे; नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

पुणे शहरात विधानसभा निवडणुकीचं तिकीटवाटप करताना भाजपने निष्ठावंतांवर अन्याय केल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत असून कॅन्टोन्मेंट परिसरातील भाजप पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.