Maharashtra Police Bharti 2024 | महाराष्ट्र पोलीस भरतीची अधिसूचना जारी, तब्बल 17 हजार 471 पदांची होणार भरती

Maharashtra Police Bharti 2024 
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Maharashtra Police Bharti 2024  | आम्ही तुमच्यापर्यंत विविध नोकरीच्या संधीची माहिती पोचवत असतो. जेणेकरून तरुणांना एक चांगली नोकरी मिळण्यासाठी मदत होईल. आज देखील आम्ही तुमच्यासाठी अशीच एक नोकरीची चांगली संधी घेऊन आलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल (Maharashtra Police Bharti 2024 ) या पदाचे भरती सुरू केलेली आहेत. याबाबत त्यांनी अधिसूचना देखील जारी केलेली आहे त्या अधिसूचनेनुसार यावर्षी तब्बल 17 हजार 471 रिक्त जागा त्यांनी जाहीर केलेल्या आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी त्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज देखील मागवलेले आहेत. 31 मार्च 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरती करायची असेल तर तुम्ही लवकरात लवकर सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.

रिक्त जागा तपशील | Maharashtra Police Bharti 2024 

या पोलीस भरतीमध्ये विविध पदांसाठी 17471 रिक्त जागा आहेत आता त्या रिक्त जागा आपण पाहूया

  • पोलीस कॉन्स्टेबल – 9575 जागा
  • पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर -1686 जागा
  • पोलीस कॉन्स्टेबल – 41 जागा
  • एक जेल कॉन्स्टेबल – 1800 जागा
  • सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल -1349 जागा

ऑनलाइन अर्ज कसा करायचा

  • महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी (Maharashtra Police Bharti 2024 ) तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • यासाठी आम्ही खाली एक लिंक देत आहोत त्यावर क्लिक करून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे.
  • या महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती अर्ज प्रक्रिया 31 मार्च 2024 पर्यंत आहेत त्यामुळे त्याआधीच हा अर्ज करायचा आहे.

परीक्षा शुल्क | Maharashtra Police Bharti 2024 

अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीनेच शुल्क भरायचे आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 450 रुपये शुल्क आहे. तर आरक्षित उमेदवारांना 350 रुपये शुल्क आहे.

निवड प्रक्रिया

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल (Maharashtra Police Bharti 2024 ) या पदासाठी तुम्हाला सगळ्यात आधी शारीरिक परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर तुमची लेखी चाचणी होईल. आणि त्यानंतर कौशल्य चाचणी होईल या तिन्ही चाचण्यांमध्ये जर तुम्ही पास झाला तरच तुम्हाला या पदासाठी भरती केली जाईल.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा