Maharashtra Police Recruitment 2024 | जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत. त्याच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आजपासून म्हणजेच 5 मार्च 2024 पासून राज्यभरात तब्बल 17000 पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे आजपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. या पोलीस भरतीबाबतची माहिती अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचप्रमाणे 31 मार्च अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा.
मागील अनेक दिवसांपासून राज्यभरात पोलीस भरतीची ( Maharashtra Police Recruitment 2024)मागणी येत होती. त्यामुळे आता राज्य सरकारने पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू केलेली आहे. मागील अनेक वर्षापासून राज्यात मोठी पोलीस भरती झालेली नाही. त्यामुळे आता तब्बल 17000 पदांसाठी अर्ज मागविण्यात आलेली आहे.
कोणत्या पदांसाठी होणार भरती |Maharashtra Police Recruitment 2024
पोलीस शिपाई, पोलिश शिपाई चालक, कारागृह कॉन्स्टेबल या पदांसाठी ही भरती होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
पोलीस भरतीची (Maharashtra Police Recruitment 2024) ही अर्ज प्रक्रिया 5 मार्च 2024 पासून सुरु होणार आहे तर 31 मार्च 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज शुल्क
पोलीस भरतीचा अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये शुल्क आहे, तर राखीव वर्गासाठी 350 रुपये परीक्षा शुल्क आहे.
शैक्षणिक पात्रता
पोलीस भरतीसाठी ( Maharashtra Police Recruitment 2024)अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे खूप गरजेचे आहे.
वयोमर्यादा
पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुमचे वय 18 ते 28 या दरम्यान असणे खूप गरजेचे आहे.
भरती प्रक्रिया कशी होणार
ही भरती प्रक्रियेमध्ये आधी उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाईल त्यानंतरच पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.