‘हा’ फोटो शेअर करत महाराष्ट्र पोलिसांचे कोरोनाचे बारा वाजवण्याचे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | कोरोनाव्हायरसने सध्या जगभर थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४ हजारच्या जवळ पोहोचली आहे. तर राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८०० पार गेला आहे. यापार्श्वभुमीवर पोलिस प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र पोलिस नेहमीच ट्विटरवरुन नवनवील शक्कल लढवून नागरिकांचे प्रबोधन करत असतात. आता कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मला राहुद्या ना घरी अशा आशयाचा एक फोटो ट्विट करत पोलिसांनी अनोख्या पद्धतीने लोकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, घरी राहूनच बारा वाजवूया कोरोमाव्हायरसचे असं कॅप्शन सदर फोटोलस महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आले आहे. हे ट्विट नागरिकांना चांगलेच भावले असून अनेकांनी ते रिट्विट देखील केले आहे. अभिनेता अतुल कुलकर्णी यानेही महाराष्ट्र पोलिसांच्या या हटके ट्विटवरुन कौतुक केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यात आज २३ नवे करोनाग्रस्त, राज्यातील आकडा पोहोचला ८९१ वर

१४ एप्रिलनंतर लॉकडाउन हटणार, असं कुणीही गृहित धरू नये- राजेश टोपे

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी मास्क घालून स्वतःच चालवली गाडी

मिस इंग्लंडचा मुकुट उतरवून ‘ही’ भारतीय सुंदरी बनली डाॅक्टर