Maharashtra Politics : अमित शहा फडणवीसांना चेकमेट करणार? म्हणूनच शिंदेंना ताकद देण्याची खेळी

Maharashtra Politics
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Politics : अमित शाह याना देवेंद्र फडणवीसांना चेकमेट करायचा आहे. म्हणून ते एकनाथ शिंदेंना ताकद देण्याचा प्रयत्न करत आहते. अमित शाह यांना देवेंद्र फडणवीसांची ताकद वाढू द्यायची नाही. त्यांना फडणवीसांना दिल्लीच्या दिशेने येऊ द्यायचं नाही. म्हणून ते एकनाथ शिंदेंना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात असा मोठा आणि खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सध्या आजारी असलेल्या राऊतांनी आज खूप दिवसानंतर पत्रकार परिषद घेतली आणि सत्ताधाऱ्यांवर आपल्या खास शैलीत टीकेची झोड उठवली.

संजय राऊत म्हणाले, मिंध्यांचा पक्ष हा अमित शाहांचा पक्ष आहे. एकनाथ शिंदेची कुठेही ताकद नाही, ही भारतीय जनता पक्षाच्या मतानं त्यांना आलेली सूज आहे आणि पैसे यंत्रणा बाकी अमित शाहाचं इंजेक्शन टॉनिक आहे. एकनाथ शिंदेंची जर ताकद असती तर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांकडून एवढे अपमान होऊन ते अमित शाहांकडे रडत गेले नसते . आणि दुसरीकडे अमित शहांना देवेंद्र फडणवीसांना चेकमेट करायचा आहे म्हणून ते एकनाथ शिंदेंना ताकद द्यायचा प्रयत्न करतात. Maharashtra Politics

वेगळ्या विदर्भावरुन भाजप- काँग्रेसवर घणाघात – Maharashtra Politics

दरम्यान, राज्यात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा वर आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळ्या विदर्भासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करत असल्याचे म्हंटल होते, त्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही बावनकुळे यांच्या विधानाची री ओढली. यावरून संजय राऊतांनी भाजप आणि काँग्रेस दोघांनाही खडेबोल सुनावले. आम्ही वडेट्टीवार अथवा काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्त्व देत नाही. यापूर्वी सुद्धा या मुद्यावरून आमचा आणि काँग्रेसचा वाद झाला आहे. तर महाराष्ट्र अखंड राहावा यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठांची सहमती आहे. काँग्रेसनं कितीही आपटली तरी वेगळा विदर्भ होणार नाही. भारतीय जनता पक्षाने किती प्रयत्न केला तरी मराठी माणूस महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही. आता तर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आहेत महाराष्ट्राच्या भूमिकेवर मराठी माणसाच्या भूमिकेवर असं म्हणत संजय राऊतांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीला तीव्र विरोध केला.