हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – तब्बल सात दशकांनंतर म्हणजे सत्तर वर्षांनंतर भारतीय भूमीत चित्ते परतले आहेत. नामिबियातून आणलेले आठ चित्ते (Cheetah) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो अभारण्यात सोडण्यात आले. आठ चित्त्यांमध्ये (Cheetah) 4 मादी आणि 3 नर यांचा समावेश आहे. आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त या चित्त्यांना कुनो अभयारण्यात सोडले.
कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांसाठी (Cheetah) विशेष सोय करण्यात आली आहे. चित्त्यांना एक महिना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. कुनो नॅशनल पार्क हे 748 चौरस किलोमीटरवर पसरलेलं संरक्षित क्षेत्र आहे. या पार्कमध्ये चित्त्यांसाठी 12 किमी लांब कुंपण उभारण्यात आले आहे. चित्त्यांना सुरुवातीला या अधिवासात ठेवण्यात येणार आहे. यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
https://www.instagram.com/tv/CisH-bKolgD/?igshid=NDRkN2NkYzU%3D
काय म्हणाले हनुमंत पवार ?
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबानी परवा प्रदेशातून आठ चित्ते (Cheetah) आणले. आणि त्या चित्यांना सोडण्याचा त्यांनी एक इव्हेंट साजरा केला. आणि दिवसभर फोटो काढण्याचे छंदपण त्यांनी साजरे केले. भारताच्या पंतप्रधानांनी २०१४च्या आणि २०१९च्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सांगितले होते आम्ही दाऊद, मेहुल चोक्सी, मल्ल्या यांना भारतात आणणार त्याचबरोबर काळा पैसादेखील भारतात आणणार असे सांगणारे मोदी मांजर जमातीच्या 4 चित्यांना आता भारतात आणत आहेत आणि स्वतःची छाती बडवून घेत आहेत. मोदींनी हे इव्हेंट जरूर साजरे करावे पण त्याचबरोबर त्यांनी जे शुद्र राजकारण केले आहे त्याचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी निषेध केला आहे.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय