हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Railway Projects । महाराष्ट्रात सध्या रस्त्याची आणि रेल्वेची कामे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. मागच्या काही वर्षात रेल्वे विभागाचा खास करून मोठा कायापालट झाला आहे. अनेक मार्गावर रेल्वेसेवा सुरु झाली आहे. नवनवीन शहरे रेल्वेने जोडण्यात आली आहेत. महाराष्ट्रतील रेल्वे हि, मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे या चार रेल्वे विभागांच्या अखत्यारीत येते. या विभागांसाठी 2025–26 आर्थिक वर्षासाठी 3,751 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी आतापर्यंत 813 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.
१ एप्रिल २०२५ पर्यंत महाराष्ट्रात पूर्णपणे/अंशतः ८९,७८० कोटी रुपये खर्चाचे एकूण ५,०९८ किमी लांबीचे ३८ प्रकल्प (११ नवीन लाईन्स, ०२ गेज रूपांतरण आणि २५ दुहेरीकरण) मंजूर करण्यात आले आहेत, (Maharashtra Railway Projects) त्यापैकी २,३६० किमी लांबीचे काम सुरू झाले आहे आणि मार्च २०२५ पर्यंत ३९,४०७ कोटी रुपये खर्च झाला आहे,” असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले. २००९ ते २०१४ दरम्यान, दरवर्षी सरासरी फक्त ५८.४ किमी नवीन रेल्वे ट्रॅक सुरू करण्यात आले होते मात्र अलीकडच्या काळात रेल्वे कामाची गती लक्षणीयरीत्या वाढली असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
मुंबई शहरातील रेल्वे प्रकल्प – Maharashtra Railway Projects
मुंबई उपनगरीय क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि प्रवाशांच्या भविष्यातील मागण्या पूर्ण करण्यासाठी, 8,087 कोटी रुपये खर्चाचा मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प (एमयूटीपी )-II, 10,947 कोटी रुपये खर्चाचा एमयूटीपी -III आणि 33,690 कोटी रुपये खर्चाचा एमयूटीपी -IIIA मंजूर करण्यात आला असून, या प्रकल्पांमध्ये मुंबई उपनगरीय क्षेत्रातील कामांचा समावेश आहे.
मुंबई सेंट्रल-बोरिवली सहावी मार्गिका (30 किमी) – 919 कोटी रुपये
गोरेगाव-बोरिवली हार्बर मार्गाचा विस्तार (7 किमी) – 826 कोटी रुपये
विरार-डहाणू रोड तिसरी आणि चौथी मार्गिका (64 किमी) – 3587 कोटी रुपये
सीएसटीएम-कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गिका (17.5 किमी) – 891 कोटी रुपये
पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडॉर (29.6 किमी) – 2782 कोटी रुपये
ऐरोली-कळवा (उन्नत) उपनगरीय कॉरिडॉर लिंक (3.3 किमी) – 476 कोटी रुपये
बोरिवली-विरार पाचवी आणि सहावी मार्गिका (26 किमी) – 2184 कोटी रुपये
कल्याण-आसनगाव दरम्यान चौथी मार्गिका (32 किमी) – 1759 कोटी रुपये
कल्याण-बदलापूर दरम्यान तिसरी आणि चौथी मार्गिका (14.05 किमी) – 1510 कोटी रुपये
कल्याण यार्ड-मेन लाइन आणि उपनगरीय मार्गीकेचे विलगीकरण – 866 कोटी रुपये
नायगाव ते जुचंद्र दरम्यान (दुहेरी मार्ग) वसई बायपास लाइन (5.73 किमी) – 176 कोटी रुपये
महाराष्ट्रातील पूर्ण झालेले किवा अंतिम टप्प्यात असणाऱ्या प्रकल्पाची यादी
जबलपूर-गोंदिया गेज रूपांतरण (300 किमी) – 2005 कोटी रुपये
छिंदवाडा-नागपूर गेज रूपांतरण (150 किमी) – 1512 कोटी रुपये
पनवेल-पेण दुहेरीकरण (35 किमी) – 263 कोटी रुपये
पनवेल-रोहा दुहेरीकरण (75 किमी) – 31 कोटी रुपये
पेण-रोहा दुहेरीकरण (40 किमी) – 330 कोटी रुपये
उधना-जळगाव दुहेरीकरण (307 किमी) – 2448 कोटी रुपये
मुदखेड-परभणी दुहेरीकरण (81 किमी) – 673 कोटी रुपये
भुसावळ – जळगाव तिसरी मार्गिका (24 किमी) – 325 कोटी रुपये
जळगाव-भुसावळ चौथी मार्गिका (24 किमी) – 261 कोटी रुपये
दौंड-गुलबर्गा दुहेरीकरण (225 किमी) – 3182 कोटी रुपये
महाराष्ट्रात पूर्णतः किवा अंशतः येणारे काही मोठे प्रकल्प पुढील प्रमाणे
अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ नवीन मार्गिका (261 किमी.) – 4,957 कोटी रुपये
बारामती-लोणंद नवीन मार्गिका (64 किमी.) – 1,844 कोटी रुपये
वर्धा-नांदेड नवीन मार्गिका (284 किमी.) – 3,445 कोटी रुपये
धुळे (बोरविहीर)-नरडाणा नवीन मार्गिका (51 किमी.) – 1,171 कोटी रुपये
मनमाड-इंदूर नवीन मार्गिका (309 किमी.) – 16,321 कोटी रुपये
वडसा-गडचिरोली नवीन मार्गिका (52 किमी.) – 1,886 कोटी रुपये
जालना-जळगाव नवीन मार्गिका (174 किमी.) – 5,804 कोटी रुपये
पुणे-मिरज-लोंडा दुहेरीकरण (466 किमी.) – 6,463 कोटी रुपये
दौंड मनमाड दुहेरीकरण (236 किमी.) – 30,376 कोटी रुपये
मुदखेड – मेडचाळ आणि महबूबनगर – ढोणे विभाग दुहेरीकरण (417 किमी.) – 4,686 कोटी रुपये
होटगी-कुडगी-गदग दुहेरीकरण (284 किमी.) – 2,459 कोटी रुपये
कल्याण-कसारा – तिसरी मार्गिका (68 किमी.) – 1,433 कोटी रुपये
वर्धा-नागपूर तिसरी मार्गिका (76 किमी.) – 698 कोटी रुपये
वर्धा-बल्लारशाह तिसरी मार्गिका (132 किमी.) – 1,385 कोटी रुपये
इटारसी-नागपूर तिसरी मार्गिका (280 किमी.) – 2,450 कोटी रुपये
मनमाड जळगाव तिसरी मार्गिका (160 किमी.) – 1,677 कोटी रुपये
काझीपेट-बल्लारशाह – तिसरी मार्गिका (202 किमी.) – 3,183 कोटी रुपये
राजनांदगाव-नागपूर तिसरी मार्गिका (228 किमी.) – 3,545 कोटी रुपये
वर्धा-नागपूर चौथी मार्गिका (79 किमी.) – 1,137 कोटी रुपये
जळगाव-मनमाड चौथी मार्गिका (160 किमी.)
मागील तीन आर्थिक वर्षांपासून , महाराष्ट्रातील पूर्णतः किंवा अंशतः एकूण 7979 किमी लांबीच्या (26 नवीन मार्ग, 2 गेज परिवर्तन आणि 66 दुहेरीकरण) प्रधानमंत्री गतीशक्ती राष्ट्रीय बृहत् आराखड्याअंतर्गत प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली (Maharashtra Railway Projects) आहे. यामध्ये मराठवाडा विभागातील प्रकल्पांचाही समावेश आहे. काही महत्त्वाची प्रकल्पाची नावे
उस्मानाबाद-बीड-छत्रपती संभाजीनगर नवीन मार्ग – 240 किलोमीटर
छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव नवीन मार्ग – 93 किलोमीटर
बोधन-लातूर नवीन मार्ग – 135 किलोमीटर
कलबुर्गी-लातूर नवीन मार्ग – 139 किलोमीटर
लातूर-नांदेड नवीन मार्ग – 104 किलोमीटर
जालना-खामगाव नवीन मार्ग – 155 किलोमीटर
छत्रपती संभाजीनगर-परभणी दुहेरीकरण – 177 किलोमीटर




