Maharashtra Rain : छत्र्या काढा रे!! राज्यात 5 दिवस पावसाचा धुमाकूळ; तुमच्या भागात कसं असेल वातावरण

Maharashtra Rain
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे (Maharashtra Rain) थैमान अजूनही सुरूच राहणार आहे. पुढील ५ दिवस पावसाची जोरदार बॅटिंग बघायला मिळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अरबी समुद्रात 22 मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे 19 ते 25 मे दरम्यान नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

कोणत्या भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार? Maharashtra Rain

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर बुधवारी आणि गुरुवारी 35 ते 45 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहू शकतात. या वाऱ्यांचा वेग 55 किलोमीटर प्रतितास एवढा असण्याची शक्यता आहे.. कोकण आणि घाट विभागात मुसळधार पाऊस पडू शकतो. मुंबईसह, सातारा, पुणे, सांगली कोल्हापूर, अहिल्यानगर या पश्चिम भागाला पावसाचा तडाखा बसू शकतो. तर, विदर्भ, मराठवाडा मध्येही अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळेल. मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह या भागात पावसाची बॅटिंग बघायला मिळेल. अरबी समुद्रामध्ये कर्नाटक किनारपट्टीजवळ गुरुवारी, 22 मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रभावामुळे पाऊस धुमाकूळ घालणार आहे. जवळपास ५ दिवस धुवाधार पाऊस पडेल. त्यामुळे आत्ताच तुमच्या घरातील छत्र्या बाहेर काढा. Maharashtra Rain

अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Rain) कोकणासह मध्य महाराष्ट्रात ‘ऑरेंज अलर्ट’सुद्धा जारी करण्यात आला आहे. तर, विदर्भातही काही ठिकाणी पाऊस जोरदार बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. काही भागांमध्ये पावसाच्या सरी इतका जोर धरतील की, त्यामुळं समोरचं काही दिसणार नाही, अशी स्थितीसुद्धा निर्माण होऊ शकते. धुव्वाधार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचणे, अचानक पूरस्थिती निर्माण होणे, कमकुवत झाडे पडणे, झाडांच्या फांद्या तुटून पडणे अशा गोष्टींना तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवास करत असताना नागरिकांनी सावध आणि सतर्क राहणे गरजेचं आहे.