हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या अनेक ठिकाणी चांगलीच मुसळधार पावसाला (Maharashtra Rain) सुरुवात झालेली आहे. अनेक ग्रामीण भागातील जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे. नदी, नाल्या, धरणे सगळे वाहून जात आहे. अशातच हवामान विभागाने आज राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दिलेली आहे. तसेच अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.
हवामान दिलेल्या माहितीनुसार आज म्हणजे 24 जुलै 2024 रोजी मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस (Maharashtra Rain) सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना देखील आज पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. त्याचप्रमाणे पालघर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांना देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, वाशिम आणि अमरावती या भागात देखील आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस चालू आहे. त्यामुळे वारणा, नदी तसेच कृष्णा नदीच्या पाणी पातळी देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी ही 30 ft पर्यंत पोहोचलेली आहे. त्याचप्रमाणे कोणतीही दुर्घटना होऊ नये, म्हणून कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी सांगली महापालिकेकडून सुरुवात देखील करण्यात आलेली आहे.
कोल्हापूरमध्येही मुसळधार पाऊस- Maharashtra Rain
कोल्हापूरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे येथील लोकांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. या ठिकाणी कळंबा तलाव हा आता 100% भरलेला आहे. आणि तलावाच्या आजूबाजूला देखील पाणी बाहेर पडत आहे. त्यामुळे आता अनेक नागरिक हे कळंबा तलाव पाहण्यासाठी गर्दी करत आहे. परंतु या नागरिकांना देखील सावधानतेच इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे.