Maharashtra Rain Updates : कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा; तुमच्या जिल्ह्यातील वातावरण कसं असेल?

Maharashtra Rain Updates 13 june
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Rain Updates। तब्बल १० दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. काल राज्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्यानंतर आजही वरुणराजा बरसताना दिसतोय. हवामान विभागाने आज कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोकण पट्ट्याला पावसाचा जोरदार तडाखा बसू शकतो. हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. तसेच मान्सून येत्या २४ तासांत तासांमध्ये विदर्भाच्या काही भागांमध्येही पोहोचण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होत आहे. आंध्र प्रदेशच्या उत्तर किनाऱ्यापासून ओडिशापर्यंत हवेच्या वरच्या थरात चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे. छत्तीसगड, मराठवाडा, कर्नाटकचा अंतर्गत भाग येथून कर्नाटकच्या किनाऱ्यापर्यंत चक्रीय वातस्थितीच्या वरच्या भागात ढगांची द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. तसेच पंजाब ते आग्नेय मध्य प्रदेशपर्यंत चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे. राजस्थानच्या आग्नेय भागापासून मध्य प्रदेशपर्यंत चक्रीय वातस्थिती आहे. याच्या एकत्रित परिणामामुळे राज्यात १७ जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. Maharashtra Rain Updates

कोणत्या भागात कस आहे वातावरण? Maharashtra Rain Updates

आज शुक्रवारी हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, विजांच्या कडकडाटासह वादळ, वादळी वारे ताशी ६० किमी वेगाने वाहतील. कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमध्येही १९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची (Maharashtra Rain Updates) शक्यता आहे. विदर्भात सोमवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.