हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जुलै महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाने (Maharashtra Rain) जोरदार हजेरी लावली. त्यानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती परंतु आता पावसाचा जोर आणखी एकदा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. 1 ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारपासून पुढील दोन-तीन दिवस मुंबई, ठाणे त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जून महिन्यात महाराष्ट्रात जास्त पाऊस (Maharashtra Rain) पडला नाही, परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीला संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर थोडी विश्रांती घेतल्यानंतर आता पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावलेली आहे. मराठवाडा वगळता संपूर्ण राज्यात यावर्षी जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडलेला आहे. राज्यातील धरणांमधील पाणीसाठा देखील चांगला जमा झालेला आहे.
पावसाने पुन्हा एकदा चांगलाच महाराष्ट्रात जोर धरलेला आहे. त्यामुळे मुंबईसह अनेक भागात देखील पाऊस पडणार आहे. सध्या अरबी समुद्राने सौराष्ट्राच्या भागात चक्रकार वाऱ्याप्रमाणे स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवस मुंबईमध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
कोणत्या जिल्ह्याना अलर्ट? Maharashtra Rain
हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. गुरुवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भात देखील पावसाचा जोर चांगलाच वाढणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई, रत्नागिरी, पुणे, रायगड, सातारा ठाणे या जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांना देखील पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे.