Maharashtra School Close | 25 सप्टेंबर रोजी राज्यातील सगळ्या शाळा असणार बंद; हे आहे मोठे कारण

Maharashtra School Close

Maharashtra School Close | राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये अनेक सण आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शाळांना सुट्टी होती. परंतु आता राज्यातील सर्व शाळा 25 सप्टेंबर रोजी बंद होणार आहे. कारण या दिवशी राज्यभरातील प्राथमिक शाळा शिक्षक आंदोलन करणार आहेत. आणि शिक्षकांच्या याच आंदोलनामुळे 25 सप्टेंबर रोजी शाळा बंद ठेवण्यात निर्णय घेण्यात आलेला आहे. शिक्षक संचमान्यतेचा 15 मार्च 2024 मध्ये आणि कंत्राटी शिक्षण भरती तसेच निर्णय हा 5 सप्टेंबर 2024 रोजी काढण्यात आला होता.

सरकारने हे दोन्ही निर्णय वाडी वस्तीवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहेत. त्यामुळे हे निर्णय रद्द करण्यात यावेत. अशी मागणी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी सरकारकडे केली होती. हे नियम रद्द व्हावे यासाठी शिक्षकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा देखील काढण्यात आला होता. आंदोलन देखील झाले होते. परंतु त्याचा काही फायदा झालेला नाही. त्यामुळे येथे 25 सप्टेंबर रोजी सर्व राज्यातील शाळा बंद ठेवणार आहेत. आणि शिक्षक पुन्हा एकदा सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. यावेळी अनेक ठिकाणी आंदोलन होण्याची देखील शक्यता आहे. पुणे येथे झालेल्या शिक्षण संघटनेच्या बैठकांमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

सरकारने काढलेल्या नवीन धोरणानुसार ज्या शाळेची पटसंख्या 20 किंवा त्यापेक्षा कमी आहे. त्या शाळांमध्ये एकच शिक्षक दिला जाणार आहे. त्यासोबत सेवानिवृत्ती शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता शाळांचा दर्जा घसरून बंद पडण्याची भीती शिक्षक संघटनेने व्यक्त केलेली आहे. त्यामुळे सरकारचा हा नवीन नियम रद्द व्हावा, यासाठी राज्यातील शिक्षक हे आंदोलन करणार आहेत. सरकारने जर त्यांचा हा निर्णय रद्द केला नाही. तर ग्रामीण भागातील जवळपास 1 लाख 85 हजार विद्यार्थी आणि 29 हजारांपेक्षा जास्त शिक्षकांची भवितव्य अंधारात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे नियम रद्द करावेत, अशी मागणी राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी केलेली आहे. त्यामुळे 25 सप्टेंबर रोजी एक मोठे आंदोलन होणार आहे आणि याकरिता सगळ्यांनी सामूहिक रजा आंदोलन जाहीर केलेले आहे.