नवी मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या गेशन नाईक यांना भाजपने चांगलाच धक्का देत बेलापूर मधून मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या गणेश नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विचारपूस करायला सुरुवात केली. त्यानंतर गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांनी एक पाऊल मागे येत वडिलांसाठी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे ऐरोली मतदारसंघातून गणेश नाईक हे भाजपचे उमेदवार असणारा आहेत.
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या गणेश नाईक यांना पदोपदी अपमान सहन करावा लागत असल्याचे सध्या चित्र आहे. त्यांना बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबत भाजपमध्ये चर्चा होती. मात्र भाजपने मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देऊन गणेश नाईक यांचा पत्ता कट केला. तर संदीप नाईक आमदार असणाऱ्या ऐरोली मतदारसंघातून भाजपने संदीप नाईक यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र गणेश नाईक यांच्या कार्यकर्त्त्यांमध्ये खदखद कायम होती. त्यामुळेच संदीप नाईक यांनी एक पाऊल मागे येऊन आपली उमेदवारी वडिलांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेश नाईक यांच्या सोबत नवी मुंबईच्या ५६ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ज्या संख्ये सोबत ते भाजपमध्ये गेले आहेत. ते पाहता त्यांना तशा पध्द्तीचा सन्मान भाजपने दिला नाही. म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे स्वाभिमान दुखावलेले गणेश नाईक कितीकाळ भाजपमध्ये राहणार हे देखील पाहण्यासारखे राहणार आहे.