कोकणातील शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; काजू- आंबा उत्पादन वाढीसाठी निधीची घोषणा

state government mango and cashew
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंब्याला हमीभाव मिळावा आणि आंबा बागायतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जातात. आंबा व काजू उत्पादन वाडीसाठी अर्थसहाय्य्य केले जाते. आंब्यांची चव चाखण्याची वेळ आलेली असतानाच आता या वातावरणात राज्य सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयामुळे कोकण पट्ट्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

कोकणातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दोन महत्वपूर्ण निर्णय घेतले असून त्यामध्ये मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधी आणि तरतुदींमुळे शेतकऱ्यांना काजू उत्पादन आणि विक्रीत मदत होणार आहे.

शेतकरी मित्रानो, तुम्हालाही सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर सेवा केंद्रात जाऊन पैसे खर्च करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. हॅलो कृषी हे अँप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि सरकारी योजनांचा फायदा घ्या. याव्यतिरिक्त Hello Krushi वर तुम्हाला बाजारभाव, हवामान अंदाज, सातबारा उतारा, जमीन मोजणी याबाबतची संपूर्ण माहिती अगदी मोफत मध्ये मिळते. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi डाउनलोड करून मोबाईल मध्ये Install करा. आणि वेगवेगळ्या कृषी योजनांचा आणि सरकारी अनुदानाचा लाभ घ्या.

Hello Krushi डाउनलोड करण्यासाठी Click Here

Cashew

काजू फळपिक विकास योजनेअंतर्गत 1 हजार 325 कोटींची तरतूद

राज्य सरकारने काजू फळपिक विकास योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तब्बल 1 हजार 325 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. काजू लागवड वाढावी आणि त्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया व्हावी म्हणून काजू फळपिक विकास योजना समितीने काही शिफारशी केल्या होत्या. या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी सरकारने तब्बल 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

mango

आंबा फळ पिकासाठी स्वतंत्र बोर्ड स्थापनेस मान्यता

कोकणातील हापूससह इतर जातीच्या आंब्याला जगभर मागणी केली जाते. कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्टया सक्षम व्हावा, त्यांना आंबा विक्रीतून चांगला फायदा व्हावा म्हणून आंबा फळ पिकासाठी स्वतंत्र बोर्ड स्थापनेस मान्यता देण्यात आली आहे. कोकणातील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरत असून, आंबा फळ पिकासाठीही स्वतंत्र बोर्ड स्थापन होणार आहे. काजू बोंडू फळ प्रक्रिया संदर्भात स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही देण्यात सरकारकडून देण्यात आले आहे.

Cashew

मुंबई- गोवा महामार्गाच्या दुतर्फा भरणार काजू

मुंबई- गोवा महामार्गावर दुतर्फा काजूची कलमे लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ओरिसा, केरळ, कर्नाटकच्या धर्तीवर वन जमिनीवर ही लागवड केली जाणार आहे. ज्याअंतर्गत कोकणातील 42 हजार हेक्टर जमिनीवर काजू लागवड केले जाईल.

कुठे योजनेची अंलबजावणी होणार?

संपूर्ण कोकण पट्टा आणि कोल्हापूरातील आजरा, चांदगड तालुक्यामधील भूभागावर ही योजना राबवली जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना काजू कलमं उपलब्ध करून देणं, गोदाम उभारणी, भांडवल, जीआय मानांकन अशा सुविधांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार असून, यासाठी तब्बल 425 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.