कोकणात होणार राज्यातील सगळ्यात मोठा प्रकल्प; 38000 बेरोजगारांना मिळणार नोकरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात महायुती सरकार आल्यापासून अनेक मोठ मोठे बदल होताना दिसत आहे. राज्यात अनेक मोठे प्रकल्प देखील उदयास येत आहे. ज्याचा फायदा राज्यभरातील नागरिकांना होणार आहे. अशातच आता रत्नागिरी येथील वाटद झाडगाव या ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात क्षेत्रात जवळपास 2950 कोटी गुंतवणुकीचा दोन प्रकल्पांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिलेली आहे. या नवीन प्रकल्पामुळे आता अनेक तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. या ठिकाणी 38120 रोजगार निर्मिती होणार आहे. या गुंतवणूक प्रकल्पामध्ये सिलिकॉन वेफर्स एटीएमपी साहेब आणि एरोस्पेस संरक्षण या क्षेत्राशी संबंधित असणार आहेत.

हा प्रकल्प वाटत आणि झाडगाव एमआयडीसी या भागात होणार आहे. हा राज्यातील तिसरा सगळ्यात मोठा प्रकल्प असणार आहे. या प्रकल्पामध्ये जवळपास 1950 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे ते 30 हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे राज्याच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. यासोबतच रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा एक दुसरा मोठा प्रकल्प आहे. तो एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील साहित्य निर्मितीचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये जवळपास 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. आणि 4500 हजार रोजगार निर्मिती होणार आहे.

सरकारच्या या दोन्ही प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील रोजगार निर्मिती वाढणार आहे. तसेच व्यावसायिक उपक्रम स्थापित होणार आहे. यामुळे अर्थव्यवस्थेला देखील मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. यामध्ये लघु आणि मध्यम उद्योग घटकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसेच स्थानिक कामगारांसाठी प्रशिक्षण आणि कौशल्य विकासाच्या संधी देखील उपलब्ध होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाची मंत्रिमंडळ समितीची बैठक झालेली आहे. या बैठकीच्या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांसारखे लोक उपस्थित होते.