Maharashtra Tourism : मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये लाईफ किती बिझी असते हे काही वेगळे सांगायला नको. त्यामुळेच तुम्हाला रोजच्या धकाधकीमधून रिफ्रेश होण्यासाठी वेगळी शॉर्ट ट्रिप प्लॅन करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकांणाबद्दल सांगणार आहोत . जिथे तुम्ही तुमचा विकेंड मस्त एन्जॉय करू शकता. शिवाय तुम्हाला इथे जाऊन नक्की आनंद मिळेल यात शंका नाही. चला तर मग जाणून घेऊया या ठिकांणाबद्दल …
ही सर्व ठिकाणे मुंबईपासून जवळच्या अंतरावर आहेत. शिवाय ही ठिकाणे अतिशय निसर्गरम्य असून तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत येथे क्वालिटी टाइम घालवू शकता…
खंडाळा
सह्याद्री पर्वत रांगेतील पश्चिम घाटात खंडाळा हे हिल स्टेशन आहे. पुणे जिल्ह्यातलं (Maharashtra Tourism) प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण लोणावळ्यापासून साधारण ३ किमी अंतरावर खंडाळा आहे. ट्रेकिंग साठी खंडाळा प्रसिद्ध आसूंयेथे अनेक पर्यटक आवर्जून भेट देतात. वाघदरी,अमृतांजन पॉइंट,कार्ला आणि भाजा लेणी,ड्यूक्स नोज,भिशी लेक द टॅब्लेट ऑन द वॉल ऑफ द जेल, खंडाळा ऑन वेस्टर्न घाट, टोम्बस्टोन ऑफ जेसुइट्स जर्मन प्रीस्ट, मंकी हिल, GIPR स्लीपर, द वन लेड बाय जेम्स बर्कले ॲन्ड हिज टिम ही प्रसिद्ध ठिकाणे खंडाळ्यात पाहता येतील. या ठिकाणाला भेट देण्यासाठी मे महिना उत्तम आहे.
महाबळेश्वर (Maharashtra Tourism)
सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर (Maharashtra Tourism) . समुद्रसपाटीपासून १,३७२ मीटर उंचीवर पश्चिम घाटांच्या रांगेत वसलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे व सहलीचे निसर्गरम्य ठिकाण आहे. पंचगंगा मंदिर,कृष्णाबाई मंदिर,मंकी पॉइंट,आर्थर सीट पॉइंट,वेण्णा लेक,केटस् पॉईंट,नीडल होल पॉइंट,प्रतापगड,लिंगमळा धबधबा अशी ठिकाणे येथे पाहण्यासारखी आहेत आहेत. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे.
लोणावळा
पुणे जिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे. थंड हवेचे (Maharashtra Tourism) उत्तम ठिकाण आहे. लोणावळ्याच्या (Summer Holiday Destinations) चिक्की खूप प्रसिद्ध आहे. शिवाय लोणावळ्याचे भुशी धरण पावसाळी पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. पावसाळयात याठिकाणी पर्यटकांची तुडुंब गर्दी होत असते. लोणावळा आणि आसपासच्या भागात राजमाची पॉईंट,टायगर पॉईंट,कार्ला लेणी,लोहगड किल्ला,भुशी धरण अशी पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.
इगतपुरी
इगतपुरी हे मुंबई जवळील, विशेषतः पावसाळ्याच्या (Maharashtra Tourism) सुरुवातीला भेट देण्याच्या चांगल्या ठिकाणांपैकी एक आहे. येथे पाहण्यासाठी उंच डोंगररांगा ,दऱ्या आहेत. अप्रतिम निसर्ग सौन्दर्याचा अनुभव येथे तुम्ही घेऊ शकता. शिवाय इथे तुम्ही अनेक ऐतिहासिक स्थळांना सुद्धा भेट देऊ शकता.
माळशेज घाट
आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार (Maharashtra Tourism) पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल तर नगर – कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे. पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी हे परफेक्ट ठिकाण आहे.