महाराष्ट्र व्हिजन फोरम म्हणजे राज्याच्या भविष्यातील अनेक प्रश्नांवर तोडगा काढू शकणारा सामाजिक उपक्रम : Rohit Pawar

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Rohit Pawar : राज्यात मोठया प्रमाणावर डिसगाईस युथ आहे. त्या युवकांना सोबत घेत, राज्याचा विकास व्हावा ही अतोनात इच्छा असणाऱ्या नागरिकांना संधी देणारा महाराष्ट्र व्हिजन फोरम आपण लॉन्च करत आहोत,हा फोरम राज्याच्या आजच्या आणि भविष्यातील अनेक प्रश्नांचा तोडगा काढू शकणारा उपक्रम ठरेल असे मत कर्जत – जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते Rohit Pawar यांनी आज पत्रकार परिषदेत मांडले.

राज्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्य देशात प्रथम क्रमांकाचा यावे या प्रेरणेने निर्माण झालेल्या महाराष्ट्र व्हिजन फोरम या सामाजिक उपक्रमाची माहिती द्यायला हिंदू पी वाय सी जिमखाना येथे आमदार Rohit Pawar यांनी पत्र परिषदेचे आयोजन केले होते, यावेळी ते बोलत होते.

Rohit Pawar पुढे म्हणाले की “कोणत्याही संस्थेला यशस्वी व्हायचे असेल तर सर्वोत्कृष्ट मनुष्यबळ आणि आवश्यक संसाधन यांची आवश्यकता असते. महाराष्ट्राकडे या दोन्ही बाबी मोठ्या प्रमाणावर आहेत गरज आहे ती फक्त मार्गदर्शनाची तीच गरज महाराष्ट्र व्हिजन फोरम पूर्ण करेल याची मला खात्री आहे. तसेच यातून अनेक चांगले नेतृत्व देखील समोर येऊ शकतात असा सार्थ विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजचे दर पहा
आता Yes Bank ची अनेक कामे Whatsapp वरच करता येणार, कसे ते समजून घ्या
Budget Cars : 10 लाखांच्या बजटमधील ‘या’ 5 उत्कृष्ट कार, फीचर्स अन् किंमत तपासा
आता Home Loan घेण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही, घरबसल्या सहजपणे मिळवा पैसे
वाईच्या ससाणेकडून माझी 20 लाखांची फसवणूक : अभिनेते सयाजी शिंदे