महिलांवरील अत्याचाराविरोधात विशेष कायदा – गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात महिलांविरोधात वाढणाऱ्या गुन्हेगारीला आणि अत्याचाराला आळा घालण्यासाठी नवीन कायदा करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातच त्यांनी ही घोषणा केली. आंध्रप्रदेशने केलेल्या दिशा कायद्याच्या धर्तीवर हा कायदा करण्यात येणार असल्याचे गृहमंत्र्यांनी म्हणाले.

 विधानमंडळाचे अधिवेशन संपण्याअगोदर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने केलेल्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात नवीन कायदा करण्यात येणार आहे. या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी श्रीमती दोरजे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे,”  अनिल देशमुख यांनी ट्विटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

देशमुख म्हणाले,” महिलावरील अत्याचार आणि हल्ल्यांच्या घटना थांबवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आरोपींना तातडीनं आणि कठोर शिक्षा करण्यासंदर्भात आंध्र प्रदेश सरकारनं कायदा केला आहे. तसा कायदा राज्यात करण्याच्या अनुषंगानं आंध्र प्रदेशात गेलो होतो. माझ्यासोबत वरिष्ठ अधिकारीही होते. तो कायदा नीट समजून घेतला आहे. दिशा कायदा महाराष्ट्रात करण्यासाठी आणि अधिक सुधारित स्वरूपात लागू करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. असं देशमुखांनी सांगितलं.