मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदेने घेतले 20 महत्वाचे निर्णय, शेतकऱ्यांसोबत मुंबईकरांना देखील होणार फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आज म्हणजेच 5 फेब्रुवारी 2024 रोजी मंत्रिमंडळाची एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत नागरिकांच्या हिताचे तब्बल 20 निर्णय घेण्यात आलेले आहेत यामध्ये खास करून मुंबईकरांसाठी खुशखबर आलेली आहे.

हेही वाचा – Mumbai : CIDCO द्वारे मुंबईत सुरू होणार दोन महत्त्वाचे रस्ते प्रकल्प

या निर्णयानुसार मुंबईकरांना आता यावर्षी देखील मालमत्ता कर वाढ नाही तसेच शेतकरी आणि वयोवृद्धांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. आता मंत्रिमंडळाचे 20 निर्णय घेण्यात आले आहे त्याच्यात आपण एक सविस्तर नजर टाकूया

  • मुंबईकरांना यावर्षी देखील मालमत्ता कर वाढ होणार नाही.
  • राज्यामध्ये नमो महारोजगार मेळाव्या आयोजित करणार त्याचप्रमाणे दोन लाख रोजगार स्वयंरोजगार निर्माण करणार.
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील मुख्यमंत्री व यशश्री योजनेतून 65 वर्षावरील नागरिकांना लाभ मिळणार आहे.
  • उत्पादन उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीचे अनुदान देण्यात येणार आहे.
  • मधाचेगाव योजना संपूर्ण राज्यात राबणार आहे. त्याचप्रमाणे मध उद्योगाला देखील बळकटी येणार आहे.
  • पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी करण्यात येणार आहे.
  • बंजारा, लमान समाजाच्या तांड्यांच्या विकास करणार आहे. त्याचप्रमाणे मूलभूत सुविधा देखील या नागरिकांना पुरविण्यात येणार आहेत.
  • शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार नवीन इमारत बांधणी देखील करण्यात येणार आहे.
  • धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार आहेत.
  • सेवानिवृत्ती न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते मिळणार आहेत.
  • स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास सुधारित मान्यता देखील देण्यात आलेली आहे.
  • बिगर कृषी सहकारी संस्थांना त्याचप्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे पतसंस्थांना देखील मजबूत करण्यात येणार आहे.
  • दिवसे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार आहेत.
  • नांदेडच्या गुरुद्वारासाठी तथ्य सचखंड श्री हजुत साधी गुरुद्वार अधिनियम करण्यात येणार आहेत.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार आहेत.
  • कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्ष करण्यात येणार आहेत.
  • सिंधुदुर्ग जिल्हा सार्वजनिक बांधकामाचे नवीन मंडळ कार्यकाल बनणार आहे.
  • त्याचप्रमाणे गोसेवा आयोगातील सह आयुक्त संदर्भात देखील पद देणार आहेत.