महाविकास आघाडी लोकाभिमुख योजना राबवित आहे, त्यांचा सर्वांनी लाभ घ्या!-पालकमंत्री अमित देशमुख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर प्रतिनिधी । राज्यात महाविकास आघाडीचे सरकार तळागाळातील सर्व नागरीकांसाठी लोकाभिमुख योजना राबवित आहे या योजनेचा लाभ सर्व सामान्यांनी घ्यावा असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री तथा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागातंर्गत गंजगोलाई लातूर येथील शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास महापौर विक्रांत गोजमगुंडे , जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, तहसिलदार स्वप्नील पवार, माजि आमदार त्र्यंबक भिेसे ,नगरसेवक, प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

उजनीचे पाणी लातूरला येणार
लातूर शहराला उजनीचे पाणी धनेगाव डॅम मार्गे लातूरला येणार आहे. प्रत्येकाच्या घरात पाणी कसे पोहचेल या संकल्पनेने वितरण व्यवस्था अधिक सक्षम करावी लागेल अशा संबंधिताना यावेळी सुचना पालकमंत्री देशमुख यांनी यावेळी दिल्या.

महानगरपालिकेने 100 कोटीचा अराखडा दाखल करावा
लातूरच्या सार्वजनिक विकास करण्यासाठी महानगरपालिकेने 100 कोटीचा आराखडा सादर करावा अशी सुचना केली. विकास कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही याची ग्वाही दिली. लातूर शहरात प्रायोगिक तत्वावर इलेक्ट्रीक बस सुरु करण्यात येणार आहे. महानगर पालिकेने शहरात नाविण्यपूर्ण बस स्टॉपची उभारणी करावी व गंजगोलाईचे सुशोभिकरण करून शहरात सर्वात आकर्षक वास्तू म्हणून नावारुपाला येईल असे प्रयत्न करा. शहरात फेरीवाला धोरणाची तात्काळ अंमलबजावणी करावी असे सूचना संबंधितांना दिल्या.

शंभर टक्के मोफत आरोग्य सेवा देणार
लातूरमधील शासकीय महाविद्यालयाचे नुकतेच विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय असे नामकरण केले आहे. त्याचा शुभारंभ मे महिन्यात होणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनेतून इंशूरंन्स कव्हर देवून या वैद्यकीय संस्थानामार्फत शंभर टक्के मोफत आरोग्य सेवा देण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकंत्री अमित देशमुख यांनी केली.