महाविकास आघाडीचा सावळागोंध; अनेक ठिकाणी परस्परविरोधी उमेदवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी चालू झालेली आहे. जागा वाटप देखील झालेल्या आहेत.परंतु यावेळी राज्यातील राजकारणात काही वेगळ्याच गोष्टी घडताना आपल्याला दिसत आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी तयार केलेली महाविकास आघाडी कोसळण्याच्या मार्गावर आलेली आहे. विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या असताना देखील या महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचे दिसून येत आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल देखील जाहीर केला जाणार आहे. त्याचप्रमाणे अर्ज भरण्याची अंतिम तारीख देखील संपली आहे. परंतु महाविकास आघाडीतील या पक्षांनी एकमेकांच्या विरोधातच उमेदवार उभे केले असल्याचे चित्र दिसून येत आहे. या महाविकास आघाडीमध्येच एक मत नसल्याने हा पक्ष पुढे जाऊन महाराष्ट्र कसा सांभाळू शकेल? असा प्रश्न अनेक जण विचारत आहे.

महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे काम देखील अजून चालू आहे. अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस संपला आहे, तरी अजून देखील या पक्षाची अनेक कामे अपूर्ण आहेत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाल्याचे दिसून येत आहे.या नेत्यांमध्येच आपापसात बाचाबाची झाल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र चालू आहे. महाविकास आघाडीमध्ये एकमेकांच्या उमेदवाराना विरोधात उभे करण्यात आलेले आहेत.

परस्परांच्या विरोधात उमेदवार मैदानात, बंडाळीचे पेव फुटले, Mahavikas Aghadi मध्ये ‘महाबिघाडी"

महाविकास आघाडीने परांडा, दक्षिण सोलापूर, दिग्रस आणि मिरज या ठिकाणी एकमेकांच्या विरोधातच आपले उमेदवार उभे केलेले आहेत. यामध्ये दिग्रसमध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे या गटाने पवन जयस्वाल यांना उमेदवारी दिलेली आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी तानाजी सातपुते यांच्या विरोधात मोहन वानखेडे उतरलेले आहे. सोलापूर दक्षिण मध्ये उद्धव ठाकरे गटाचे अमर पाटील उभे आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे दिलीप माने यांनी अर्ज भरलेला आहे.

भायखळा विधानसभा मतदारसंघातून उबाठा गटाचे मनोज जामसूतकर यांच्या विरोधात काँग्रेसचे मधु अण्णा चव्हाण यांनाही उमेदवारी दिलेली आहे. तसेच अहिल्यानगर मध्ये संजय राऊत यांनी पैसे देऊ शरद पवार गटाला विकली असल्याचा आरोप देखील उद्धव ठाकरे यांच्यावरच आता त्यांच्या गटातील उमेदवार लागलेले आहेत. काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या विरोधात स्थानिक नेते देखील नाराज झालेले आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे आता या तीन पक्षांमध्ये आपापसात मतभेद निर्माण झालेले आहेत. आणि त्यांनी त्यांच्याच गटातील उमेदवार एकमेकांविरोधात उभे केलेले आहे.

महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्ष आणि समाजवादी पक्ष हे आघाडीचे घटक पक्ष आहेत. परंतु जागावाटप करताना या पक्षांचा विचार देखील करण्यात आलेला नाही. समाजवादी पक्षात इच्छुक असणाऱ्या जागांवर महाविकास आघाडीने त्यांचे उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे आता समाजवादी पक्षाचे नेते नाराज झालेले, असून अखिलेश यादव परस्पर उमेदवार असल्याचे त्यांनी जाहीर केलेले आहे. त्याचप्रमाणे मालेगावमध्ये या विधानसभा मतदारसंघात एक गट मतदानामुळे भाजपचे दीड लाखा पेक्षा अधिक आघाडीवर असलेले सुभाष भामरे पराभूत झाले होते. या ठिकाणी जाता समाजवादी पक्षाने त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. तसेच धुळे शहर मतदार संघात देखील समाजवादी पक्षाचे उमेदवार उतरलेले आहेत.

रायगड जिल्ह्यातील उरण, नांदेड जिल्ह्यातील लोहा या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाची ताकद आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघात देखील शेतकरी कामगार पक्ष मजबूत आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीतील पक्षांनी आपले उमेदवार देखील उतरवलेले आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे, तरी देखील महाविकास आघाडीमध्ये वाद होताना दिसत आहे. या जागावाटपाच्या चर्चेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात फिरत आहे. उबाठा गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा देखील चालू केलेली आहे. परंतु काँग्रेस त्यांच्या या मताशी अजिबात सहमत नाही. निवडणुकीआधी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची परंपरा काँग्रेसमध्ये नाही. असे मुख्यमंत्री गांधी परिवाराचे निकटवर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलेले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसच्या हाताला काहीच लागलेले नाही. त्यामुळे कोकणातील तिन्ही जिल्ह्यातील कार्यकर्ते आता प्रचंड नाराजी व्यक्त करत आहे.