मुंबई । महावितरणने जुलै २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून ७ हजार जागांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र, गेल्या वर्षभरापासून भरती प्रक्रियेचा निकाल प्रलंबित आहे. त्यामुळे गेले कित्येक महिन्यापासून उमेदवार निकालाची वाट पाहत आहेत. दरम्यान, महावितरणच्या प्रलंबित भरती प्रक्रियेतील ७ हजार जागा येत्या ८ दिवसांत भरण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “महावितरणने जुलै २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून २,००० उपकेंद्र सहायक आणि ५,००० विद्युत सहाय्यकांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविली होती. या प्रलंबित भरती प्रक्रियेचा निकाल तात्काळ जाहीर करून ८ दिवसांत संबंधितांना रूजू करून कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.” ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या या आदेशनानंतर वर्षभर रखडलेली ही भरती प्रक्रिया आता पूर्ण होणार असून निवड प्रक्रियेतील उमेदवारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”