हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यांमध्ये या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला सगळ्यात जास्त मत मिळाल्याने महायुती विजयी ठरलेली आहे. अशातच आता राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याची माहिती देखील समोर झालेली आहे. परंतु यामध्ये महायुतीने सत्ता वाटपाचा त्यांचा फॉर्म्युला देखील निश्चित केलेला आहे. या सत्ता वाटपामध्ये भाजपला सर्वात जास्त मंत्री पद दिली जाणार आहे. यामध्ये भाजपला 20 ते 22 मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेनेला 12 मंत्रीपद मिळणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 8 ते 10 जणांनी मंत्रिमंडळात जागा भेटू शकते. परंतु भाजपसहित इतर पक्षांनी त्यांच्या मंत्रिमंडळात तरुण आमदारांना संधी द्यावी, असा सल्ला देखील भाजपचे श्रेष्ठीकडून देण्यात आलेला आहे. 2 डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. अशी माहिती देखील हाती आलेली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार या मंत्रिमंडळात गृहखाते हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असू शकते. तर अर्थ खाते हे अजित पवारांकडे असू शकते. विधानसभा निवडणुका पार पडून निकाल देखील लागलेला आहे. परंतु अजूनही नवीन मंत्रिमंडळाची पूर्ण प्रक्रिया पार पडलेली नाही. याचवेळी एकनाथ शिंदे, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे. पक्षांचे खाते वाटप हा या चर्चेचा मुख्य मुद्दा होता.
यावर्षीच्या महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 13 जणांना संधी मिळणार आहे. तर भाजपला सर्वाधिक मंत्री मिळणार असल्याची माहिती हाती आलेली आहे. भाजपला जवळपास 20 ते 22 मंत्री पदे मिळू शकतात. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री कोण? तसेच दोन उपमुख्यमंत्री असतील का? असा प्रश्न संपूर्ण जनतेसमोर पडलेला आहे. परंतु एकनाथ शिंदे लगेच उपमुख्यमंत्री बनण्यासाठी उत्सुक नसल्याचे सांगण्यात आलेले आहे. यामध्ये शिवसेना गटाचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद किंवा गृहमंत्री पद मिळाले अशी मागणी देखील शिंदे गटाकडून करण्यात आलेली आहे.