सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सातारा जिल्हा क्रीडा परिषद व सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने नुकत्याच राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली. या स्पर्धांचे शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, स्व.पै.खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजित जाधव, आंतरराष्ट्रीय पंच नवनाथ ढमाळ, दिलीप पवार, आर. वाय. जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. १७ ते १९ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत श्रीमंत छत्रपती क्रीडा संकुल, सातारा येथे करण्यात आलेले आहे. क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद मुंबई, पुणे या विभागातून अंदाजे ३०० खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, संघव्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत. खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, संघव्यवस्थापक यांची भोजन व निवास व्यवस्था श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा सातारा येथे करण्यात आलेली आहे.