Mahila Samman Savings Scheme : महिलांना ‘या’ सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यास मिळते भरगोस व्याज; पहा कसा मिळतो लाभ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mahila Samman Savings Scheme) आपल्या देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ बनवण्यासाठी केंद्र सरकार कायम विविध योजना राबवत असते. प्रत्येकवेळी अर्थ संकल्पात महिलांना लक्षात घेऊन त्यांना स्वावलंबी बनवता येईल अशा योजनांची आखणी केली जाते. आज आपण अशाच एका सरकारी योजनेची माहिती घेणार आहोत. या योजनेचे नाव ‘महिला बचत सन्मान योजना’ असे आहे. ही योजना पोस्ट ऑफिस आणि काही सार्वजनिक बँकांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. ज्यामध्ये गुंतवणुकीनंतर कमी कालावधीत चांगला परतावा मिळतो. चला तर या योजनेविषयी अधिक आणि सविस्तर माहिती घेऊया.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (Mahila Samman Savings Scheme)

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही एक अल्प बचत योजना आहे. जी केवळ महिलांसाठी काम करते. या योजनेत कोणतीही महिला २ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकते. या योजनेत जमा केलेल्या रकमेवर दिला जाणारा व्याजदर हा चक्रवाढ आधारावर दिला जातो. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या महिलांना कमीत कमी कालावधीत अधिक परतावा मिळवणे शक्य होते. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेची खासियत म्हणजे, यामध्ये तुम्हाला कोणताही धोका पत्करावा लागत नाही.

किती रक्कम जमा करता येते?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही सरकारी योजना महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी राबविली जाते. (Mahila Samman Savings Scheme) या योजनेअंतर्गत खाते उघडणारी महिला कमीत कमी १ हजार रुपयांपासून ते २ लाख रुपये इतकी रक्कम जमा करू शकते. तसेच या योजनेअंतर्गत एखाद्या महिलेस दुसरे खाते उघडायचे असेल तर ते खाते ३ महिन्यांच्या अंतराने उघडता येते.

किती व्याजदर मिळतो?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक करणाऱ्या महिला ग्राहकांना वार्षिक ७.५० टक्के व्याजदर दिला जातो. लक्षात घ्या, हे व्याज ३ महिन्यांच्या आधारावर जमा केले जाते. कारण ही योजना अवघ्या २ वर्षात परिपक्व होते आणि त्यामुळे ठेवीच्या तारखेपासून १ वर्षानंतर, उर्वरित रकमेपैकी जास्तीत जास्त ४०% रक्कम काढता येते. (Mahila Samman Savings Scheme)

कमी कालावधीत अधिक परतावा

समजा तुम्ही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणूक करताना जास्तीत जास्त २ लाख रुपये गुंतवले तर, तुम्हाला ७.५० टक्के दराने एकूण ३२,०४४ रुपये इतके व्याज मिळेल. (Mahila Samman Savings Scheme) आता नीट पाहिले असता तुमच्या लक्षात येईल की, तुम्हाला मिळालेल्या व्याजाच्या रकमेसह केवळ २ वर्षांत या योजनेच्या परिपक्वतेनंतर तुम्हाला २,३२,०४४ रुपये इतका परतावा मिळेल.

परीक्वतेच्या आधी पैसे काढता येतात?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेच्या परिपक्वतेचा कालावधी हा एकूण २ वर्षांचा आहे. परंतु एखाद्यावेळी तुम्हाला या योजनेत पैसे गुंतवल्यानंतर अचानक पैशांची गरज भासली तर अशा परिस्थितीत या योजनेअंतर्गत तुम्हाला मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा मिळते. अगदी १ वर्षानंतरही तुम्ही योजनेच्या खात्यातून पैसे काढू शकता. (Mahila Samman Savings Scheme) मात्र, कोणत्याही कारणास्तव मुदतीपूर्वी खाते बंद केल्यास तुम्हाला ७.५० टक्क्यांऐवजी केवळ ५.५०% दराने व्याज दिले जाईल.