Mahindra Atom EV : महिंद्रा घेऊन येतेय सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; किंमत अन फीचर्स जाणून घ्या

Mahindra Atom EV
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महिंद्रा लवकरच आपली एक मिनी इलेक्ट्रिक कार (Mahindra Atom EV) भारतीय बाजारपेठेत आणणार आहे. कंपनीने दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2020 च्या ऑटो एक्सपोमध्ये याची घोषणा केली होती. महिंद्रा अॅटम (Mahindra Atom EV Booking) असं या नव्या इलेक्ट्रिक कारचं नाव आहे. आकाराने अतिशय लहान असणारी हि कार कमी किमतीत म्हणजे अगदी बजेट प्राईस मध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे.

खरे तर महिंद्राची नवीन महिंद्रा अॅटम हि कार २०२० रोजीच लॉन्च होणार होती. मात्र कोविड महामारीमुळे या कारचे लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आले. महिंद्राने हि इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्यानंतर ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक क्वाड्रिसायकल ठरणार आहे. सर्वसामान्य माणसाला हि गाडी परवडणार असल्यानं हि इलेक्ट्रिक (Mahindra Electric Car 2022) गाड्यांमधील मारुती 800 ठरू शकते अशी चर्चा आहे.

मॉडेल अन कारचे प्रकार? 

  • महिंद्र अ‍ॅटमचे एकूण चार प्रकार K1, K2, K3 आणि K4 मध्ये आणले जाण्याची अपेक्षा आहे.
  • त्याच्या K1 आणि K2 प्रकारांमध्ये 7.4 kWh, 144 Ah बॅटरी पॅक दिला जाईल.
  • Atom K3 आणि K4 ला 11.1 kWh, 216 Ah बॅटरी पॅक मिळण्याची शक्यता आहे.
  • K1 आणि K2 साठी पूर्ण चार्ज रेंज सुमारे 80 किमी असेल, तर K3 आणि K4 साठी रेंज सुमारे 100 किमी असणे अपेक्षित आहे. (Mahindra Atom EV Renge)

Mahindra Atom EV चे फीचर्स कोणते?

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर K1 आणि K3 एअर कंडिशनिंगच्या सुविधेसोबत येणार नाहीत. नॉन-एसी प्रकार पूर्ण चार्ज केल्यावर अधिक मैल कव्हर करण्यास सक्षम असेल. डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास, यात एक अनोखी लोखंडी जाळी, मोठ्या विंडस्क्रीनसह मोठे हेडलॅम्प दिले जाणे अपेक्षित आहे. त्याची समोरची खिडकीही मोठी असणार आहे. ही छोटी कार खूपच कॉम्पॅक्ट लूकमध्ये दिसते. ही 4 सीटर कार असून ती व्यावसायिक वापरासाठी वापरली जाऊ शकते.

महिंद्राच्या या इलेक्ट्रिक कारची किंमत काय असेल? (Mahindra Electric Car Price)

महिंद्रा अॅटम सुमारे 3 लाख रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे. लॉन्चच्या वेळी महिंद्राच्या या कारला थेट प्रतिस्पर्धी असण्याची शक्यता नाही. मात्र भविष्यात या कारला आगामी बजाज क्युट इलेक्ट्रिककडून आव्हान मिळू शकते.