Mahindra Bolero MaXX Pik-Up लाँच; 2 टन पर्यंत वजन उचलण्याची क्षमता, किंमत पहा

0
172
Mahindra Bolero MaXX Pik-Up
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्राने भारतीय बाजारात Mahindra Bolero Maxx पिकअप लाँच केली आहे. कंपनीने 7.85 लाख रुपयांच्या किंमतीत बाजारात आणली आहे. अनेक दमदार फीचर्सने सुसज्ज असलेली ही पिकअप 2 टन पर्यंत वजन उचलण्याची क्षमता ठेवते. तुम्हांला ही गाडी सिटी आणि हेवी ड्युटी अशा दोन ट्रिममध्ये उपलब्ध असेल. आज आपण जाणून घेऊयात या पिकअपची खास वैशिष्टये …

इंजिन –

नवीन बोलेरो मॅक्स पिक-अपमध्ये 2.5L डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सला जोडलेलं असून 71PS/200Nm आणि 81PS/220Nm चे आउटपुट जनरेट करते. ही गाडी 1.3 टन ते 2 टन वजन उचलण्यास सक्षम आहे. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे ही पिकअप 17.2 किलोमीटर/ लिटर मायलेज देतेय.

फीचर्स –

पिकअपच्या फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास तुम्हाला यामध्ये अनेक वेगवेगळी वैशिष्टये मिळतील. यामध्ये टेलिमॅटिक डिव्हाईस जोडलेलं आहे ज्यामुळे ही गाडी कुठे आहे हे तुम्ही ट्रॅक करू शकता. तसेच यामध्ये नवीन हेडलॅम्प, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्रंट रेडिएटर ग्रिल आणि नवीन डॅशबोर्ड देखील देण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये जिओ-फेन्सिंग, रूट प्लॅनिंग, व्हेईकल ट्रॅकिंग, एक्सपेन्स मॅनेजमेंट, हेल्थ मॉनिटरिंग यासह 50 हून अधिक वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.

किंमत किती?

पिकअपच्या किंमतीबद्दल सांगायचं झाल्यास, Mahindra Bolero Maxx ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.85 लाख रुपये आहे. तुम्ही अवघ्या 24,999 रुपयांमध्ये ही पिकअप बुक करू शकता. गाडीच्या किमती व्हेरिएन्टनुसार वेगवेगळ्या आहेत.

महिंद्रा मॅक्स पिकअप सिटी 1.3 LX CBC- 7.85 लाख रुपये

सिटी 1.3 LX – 7.95 लाख रुपये

सिटी 1.4 LX CBC – 8.22 लाख रुपये

सिटी 1.4 LX – 8.34 लाख रुपये

सिटी 1.5 LX CBC – 8.22 लाख रुपये

सिटी 1.5 LX – 8.34 लाख

सिटी सीएनजीची किंमत 8.25 लाख रुपये

हेवी ड्युटी 1.7 LX CBC – 9.26 लाख रुपये

हेवी ड्युटी 1.7 LX – 9.53 लाख रुपये

हेवी ड्यूटी 1.7L LX – 9.83 लाख रुपये

हेवी ड्युटी 2.0L LX CBC – 9.99 लाख रुपये

HD 2.0L LX – 10.33 लाख रुपये